logo

header-ad
header-ad

सडन विल्ट

सडन विल्ट

कोरड्या, आणि उष्ण हवामानानंतर अचानक पाउस झाल्यास किंवा पाणी दिल्यास ह्या रोगाची लागण होते. उशीराने केलेल्या लागवडीत मुळांना झालेल्या नुकसानीमुळे देखिल रोगाच्या प्रसारास मदत मिळते. अनेक वेळेस हा रोग ठराविक रोपांवरच दिसुन येतो. ह्या रोगाची लागण शेतातील काही भागीतील रोपांवरच दिसुन येते. रोपाचे खोड, मुळ आणि क्वचित पाने देखिल तपकिरी रंगाची दिसुन येतात.

पिकास हलक्या पाण्याची सतत सोय करुन ठेवणे हे पिकास उष्ण तापमानातुन अचानक पावसाच्या पाण्याच्या ताणापासुन वाचविण्यात मदत करण्यात सक्षम ठरते. रोगाच्या नियंत्रणात बुरशीनाशकांची मदत होणे कठिण आहे, कारण हा वातावरणातील ताणामुळे होणारा रोग आहे, तरी देखिल नियमित पाणी आणि योग्य ती बीज प्रक्रिया केल्यास फायदा होवु शकतो.

बियाण्यास ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, सुडोमोनास फ्लुरोसन्स ह्यांचा बीज प्रक्रिया म्हणुन वापर करावा.