logo

header-ad
header-ad

कापुस लागवड पध्दती

कापुस पिकाची लागवड संबंध भारतात केली जाते. या भागातील सर्वसाधारण माती परिक्षणाचे निर्ष्कषांनुसार या जमिनींत उपलब्ध नत्राचे आणि स्फुरद चे प्रमाण हे कमी ते मध्यम आहे, तर उपलब्ध पालाश चे प्रमाण हे मध्यम ते जास्त आहे. या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.३ ते ०.५६ टक्के इतके कमी आहे.

कापुस पिकाच्या मुळ्या ह्या जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये देखिल जास्त प्रमाणात शोषली जातात.

कापसाची लागवड खोल, मध्यम खोल तसेच उथळ जमिनीत केली जाते, जमिनीच्या प्रकारानुसार कापुस पिक किती अन्नद्रव्य शोषुन घेते याचा अभ्यास वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संस्थेने केला आहे, त्याचे निष्कर्ष खालिल प्रमाणे. हे निष्कर्ष भारतीय कापुस लागवडीचे आहेत.

लागवडीचे अंतर

  • कोरडवाहू लागवड : 120 x 45 सेंमी (4 x 1.5 फूट)
  • बागायती लागवड : 150 x 30 सेंमी (5 x एक फूट) किंवा 180 x 30 सेंमी (6 x 1 फूट)
  • बियाण्याचे प्रमाण : 2.5 ते 3 किलो प्रतिहेक्टर
जमिनीचा प्रकार नत्र (किलो प्रती एकर) स्फुरद (किलो प्रती एकर) पालाश (किलो प्रती एकर)
खोल जमिन २२ किलो ८ किलो २२.८ किलो
मध्यम खोल जमिन १७.६ किलो ५.२ किलो १७.२ किलो
उथळ जमिन १७.६ किलो ४.८ किलो १८ किलो