logo

header-ad
header-ad

लिफ कर्ल

कापुस पिकावरिल लिफ कर्ल किंवा पाने वाकवणारा व्हायरस हा पांढरी माशी (बेमेसिया टॅबॅकी) मुळे पसरतो.

कापुस पिकातील पांढरी माशी मुळे प्रसारित होणारा हा व्हायरस, लागण झाल्यानंतर २-३ आठवड्यांनी प्रादुर्भावाची लक्षण दाखवतो. पिकावर व्हायरसची लक्षणे ही, लागण झाल्यानंतर २-३ आठवड्यांनी दिसत असल्या कारणाने, पिकावर पांढरी माशीचा प्रार्दुभाव होणार नाही ह्याची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.

लक्षणे हि सुरवातीस कोवळ्या, नवीन पानांवर दिसुन येतात. सुरवातीच्या लक्षणात कोवळे पान वरिल बाजुस वाकते, पानास येणारा वक्र पणा हा तीव्र असतो, रोगाची लागण झाल्यानंतर कोवळ्या पानाच्या खालील पाने देखिल वरिल बाजुस वाटी सारखी किंवा खालिल बाजुस किना-याने वाकतात. पानांना सुज आल्यासारखी भासते, पानांच्या शिरा गर्द रंगाच्या होतात. पानांचा आकार एखाद्या कप सारखा, किंवा वाटीसारखा होतो.

कापुस पिकावर येणारा लिफ कर्ल व्हायरस हा बेगोमोव्हायरस ह्या कुळातील आहे. भारतातील कापुस पिकावर Cotton leaf curl Alabad virus (CLCuAV), Cotton leaf curl Kokhran virus (CLCuKV), Cotton leaf curl Multan virus (CLCuMV), Cotton leaf curl Rajasthan virus (CLCuRV), Cotton leaf curl Bangalore virus, Papaya leaf curl virus (PaLCuV) and Tomato leaf curl Bangalore virus (ToLCBV), लिफ कर्ल व्हायरसच्या ह्या प्रजातींमुळे व्हायरस रोगाची लागण होते.

नियंत्रण

व्हायरस रोगास तसे प्रभावी नियंत्रण नाही.

कापुस पिकावरिल लिफ कर्ल व्हायरस ची लागण पांढरी माशी मुळे होत असल्या कारणाने, पांढरी माशीच्या नियंत्रणाचे उपाय करावेत. पांढरी माशी बाबत असलेल्या सदरात ह्या बाबत विस्तृत माहीती दिलेली आहे.