logo

header-ad
header-ad

logo

header-ad
header-ad

बंची टॉप व्हायरस (BTV)

कापुस पिकावरिल बंचीटॉप हा रोग मावा किडी मुळे पसरतो.

रोगाच्या लक्षणात, शेंड्याची वाढ खुंटते किंवा पाने जवळजवळ येतात, पानांचा आकार लहान राहतो. रोगग्रस्त पाने हि कडेने फिक्कट हिरवी तर आतल्या बाजुने गर्द हिरवी दिसुन येतात. पिकाच्या मुळांवर जास्तच प्रमाणात बारीक केसांसारखी मुळांची वाढ दिसुन येते, तसेच दुय्यम मुळांवर लहान आकाराच्या गाठी देखिल दिसुन येतात.

रोगाची लागण झाल्यानंतर २ ते ३ आठवड्यानी लक्षणे दिसण्यास सुरवात होते.

रोगाचा प्रादुर्भाव हा मावा किडी मुळे होणार असल्याने किडीच्या प्रादुर्भावास पोषक असे वातावरण रोगासाठी देखिल पोषक ठरते.

रोगाच्या नियंत्रणासाठी कापुस पिकावरिल मावा किडिचे आधीपासुनच नियंत्रण करणे फायदेशीर ठरते.