logo

header-ad
header-ad

फायटोप्थोरा बोल रॉट

फायटोप्थोरा बोल रॉट

कापुस पिकातील बोडांची कुज हि अनेक प्रकारच्या बुरशीमुळे आणि जीवाणू मुळे होत असते.

अल्टरनॅरिया बुरशीमुळे होणा-या कुज मध्ये बोडांवर लहान आकाराचे ठिपके पडतात, ह्या ठिपक्यांचा बाहेरील भाग किंवा किनार हि गर्द रंगाची असते.

फायटोप्थोरा कुज मध्ये गर्द तपकिरी किंवा काळसर रंगाचे ठिपके पडतात, अशा ठिपक्यांवर पांढरी बुरशीची वाढ देखिल दिसुन येते. रोग ग्रस्त बोंड कडक होते, तसेच ते एकतर अजिबात उघडत नाही किंवा पक्वतेच्या आधीच उघडुन त्यातील कापुस खराब होतो.

स्लेरोशिया कुज मध्ये बोंडावर तसेच त्याचा आत देखिल २ ते १० मिमी आकाराचे काळसर ठिपके दिसुन येतात. ह्या रोगात बोंडावर तसेच त्याचा आत देखिल पांढ-या रंगाची बुरशीची वाढ दिसुन येते. ह्या रोगाची बोंडास लागण झाल्यानंतर, बोंडाच्या शेजारील फांदी वर देखिल लक्षणे दिसुन येतात.

जीवाणू जन्य बोंड कुज हि लहान बोंडावर तेलकट डाग, ज्यांच्या कडा गर्द असतात अशा रुपात दिसुन येते.

नियंत्रण

लागवडीचे योग्य अंतर ठेवुन, पिकाची फार दाटी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

पिकास अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा.

फवारणीतुन कमी प्रतिकारक शक्ती असलेल्या बुरशीनाशकांचा वापर, बोंड धारणा अवस्थेत करावा. रोगाची लागण झाल्यानंतर केलेली फवारणी फारशी फायदेशीर ठरत नाही, कारण पिकाच्या आतल्या भागात जेथे फवारणीचे द्रव पोहचु शकत नाही तेथुन रोगाची लागण, हि अनुकुल वातावरणात होण्यात मदत मिळते. फवारणी करतांना ती पिकाच्या सर्वच भागांवर व्यवस्थित पडेल ह्याची काळजी घ्यावी.

वातावरण आर्द्रतायुक्त तसेच थंड असतांना स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करावा.

फवारणीतुन मॅन्कोझेब, कॉपर ऑक्सि क्लोराईड ह्यांचा वापर करता येण्यासारखा आहे.