कापुस पिकावर रोप लहान असतांना तसेच रोपाच्या वाढीच्या काळात मुळकुज हि समस्या दिसुन येते. रोगाच्या लक्षणे हि मुळांवर बराच हल्ला झाल्यानंतर नजरेस पडत असल्या कारणाने रोगाचे नियंत्रण करणे हे कठिण होवुन बसते. रोगाची लागण झालेल्या रोपांची वाढ मंदावते.
हा रोग शेतात विखुरलेल्या ठिकाणी ठराविक जागेत दिसुन येतो. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मात्र संपुर्ण शेतातच लागण झालेली असेत. वातावरण उबदार झाल्यानंतर मुळांवरिल रोग कमी होण्यात मदत होते. रोगाच्या प्रादुर्भाव झाल्यानंतर लक्षणे दिसण्यातील कालावधी हा मोठा असल्यास शेतातील ब-याच रोपांवर हल्ला झालेला असतो. ह्या रोगाची लक्षणे हि मर रोगाप्रमाणेच दिसुन येतात. मुळांवर आणि त्याच्या लगतच्या मातीत असलेल्या खोडाच्या भागावर बुरशी हल्ला करते. थिलॅव्हिऑप्सिस बॅसिकोला आणि कॅलेरा ईलॉंगस ह्या बुरशीमुळे कापुस पिकावर मुळकुज हा रोग होतो.
बुरशीने हल्ला केल्यास मुळांवर काळसर रंगाचे स्पोअर्स दिसुन येतात. पाने पिवळी पडतात आणि गळुन जातात. रोपांची मर होते. रोगाचा जेथे हल्ला होतो तेथिल पेशी प्रथम लालसर रंगाच्या होवुन, त्यानंतर काळ्या पडुन मरुन जातात. मुळांवर वाढलेली काळी बुरशी हाताने खरचटल्यास निघुन जाते.
रोगाच्या वाढीसाठी ८.५ पेक्षा जास्त सामु असल्यास मदत मिळते. तसेच मातीत पाणी साचुन राहणे, माती ओलसर राहणे रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते.
नियंत्रण
पिक फेरपालट करावी. हा रोग तृणधान्य वर्गिय पिकांवर हल्ला करण्याची शक्यता कमी असते. करडई, गहु,ज्वारी आदी पिकांचा पिक फेरपालट मध्ये समावेश करता येईल. शेतात तण नियंत्रण योग्य वेळी करावे.
रासायनिक नियंत्रण - शेतात कापुस पिकावर हा रोग आधी देखिल दिसुन येत असल्यास ब्लिचिंग पावडर २ ते २.५ किलो प्रती एकर ह्या प्रमाणात, बागायती लागवड करण्यापुर्वी ५ ते ७ दिवस आधी ड्रिप मधुन द्यावे.
जैविक नियंत्रण – बीजाचे अंकुरण होत असतांना जमिनीतुन ट्रायकोडर्मा ह्या बुरशीचा वापर करावा.
पिकावर मेटॅलॅक्झिल, फॉसेटिल एल ची फवारणी घ्यावी.
चारकोल रॉट
हा रोग मायक्रोफोमिना फॉसिओलिना ह्या बुरशीमुळे होतो. हा रोग कापुस, मका, सोयाबीन, भुईमुग आदी पिकांवर देखिल दिसुन येतो. ह्या रोगात मुळांवर, खोडावर, पानांवर तसेच बोडांवर देखिल हल्ला करण्याची क्षमता असते. पानांवर ठिपके दिसुन येतात. हा रोग उबदार, कोरड्या वातावरणात आणि पिक तणावखाली असतांना हल्ला करतो.
खोडावर काळसर करडया रंगाची बुरशीची वाढ दिसुन येते.