logo

header-ad
header-ad

बॅक्टेरियल ब्लाईट

कापुस पिकावर येणारा हा रोग झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिस ह्या जीवाणू मुळे होतो. रोगाच्या लक्षणांत पिकाच्या पानांवर तांबुस रंगाचे ठिपके दिसुन येतात. ह्या ठिपक्यांना लालसर किंवा गर्द ताबुस रंगाची किनार असते. ब्लाईट मुळे पानांवर पडणारे ठिपके हे पानांच्या शिरांमुळे आकाराने जास्त मोठे होवु शकत नाहीत. रोगाची वाढ ही पानांवरिल शीरांना समांतर अशी होत राहते. अनेक वेळेस पानांच्या देठावर देखिल हल्ला केला जातो. पानांच्या देठावर आणि पिकाच्या खोडावर रोगाने हल्ला केल्यास तेथे देखिल गर्द तांबुस, लालसर रगांचे असे खरबडीत डाग पडतात. खोडांवर, देठावर डाग असलेल्या ठिकाणी खोलगट भाग तयार होतो. पिकाची वाढ खुंटते, पानगळ होते. हा रोग बोडांवर देखिल हल्ला करतो. रोगग्रस्त बोंडांचा आकार हा लांबुळका न राहता तो गोलाकार होतो, आणि बोडांच्या आतिल कापसाची प्रतवारी खालावते, ते रंगहिन बनते.

ह्या रोगामुळे पिकाचे १० टक्क्यांपर्यंत नुकसान होवु शकते.

रोगाच्या वाढीसाठी जास्त आर्द्रता, सततचा पाऊस आणि उबदार वातावरण पोषक ठरते.

नियंत्रण

शेतात स्वच्छता राखावी. लागवडीचे अंतर योग्य निवडुन, रोपांची जास्त दाटी होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

थंडीच्या काळात, पानांवर दव जमा होत असल्यास पाणी फवारुन किंवा रोपांना हलवुन दव नाहीसे करावे.

पिकावर कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ते ३ ग्रॅम प्रती लिटर, कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम प्रती लिटर, किटाझिन १ मिली प्रती लिटर, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड १.५ ग्रॅम आणि मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रती लिटर एकत्र करुन, किंवा व्हॅलिडामायसीन ह्या पैकि एकाची फवारणी करावी.

जैविक रोग नियंत्रणात बॅसिलस सबटिलस, सुडोमोनास फ्लुरोसन्स चा वापर करता येईल. हि जैविक उत्पादने कॉपर सोबत एकत्र वापरु नये.

बॅक्टेरियल ब्लाईट
बॅक्टेरियल ब्लाईट
बॅक्टेरियल ब्लाईट