logo

header-ad
header-ad

अल्टेरनॅरिया मॅक्रोस्पोरा आणि अल्टेरनॅरिया अल्टरॅटा

ह्या बुरशीमुळे लहान रोपांवर तसेच मोठ्या रोपांवर देखिल रोगाची लागण होते. आर्द्रता जास्त असणे आणि तापमान २७ डि.से. असणे हे रोगासाठी पोषक ठरते. जास्त आर्द्रता असल्यास पानांवरिल पर्णरंध्र बंद न झाल्याने रोगाच्या बुरशीला पानांत सहज प्रवेश मिळतो. रोगाचा प्रादुर्भाव हा सहसा रोपाच्या तळाकडिल पानांवर जास्त प्रमाणात दिसुन येतो. नविन पानांवर लागण कमी प्रमाणात दिसुन येते.

ज्यावेळेस रोप तणावाखाली असते, त्यावेळेस रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. पानांवर करड्या, काळसर, गर्द तपकिरी रंगाचे १ ते १० मिमी आकाराचे गोलाकार ठिपके पडतात. ह्या ठिपक्यांची किनार ही जांभळ्या किंवा गर्द जांभळ्या रंगाची असते. ठिपक्यांच्या आतिल गोलाकार भाग हा काही दिवसांत सुकुन जातो आणि तेथे छिद्र पडते.

कापुस पिकाची पाने अकाली गळुन जाण्याचा जो प्रकार सध्या अनेक ठिकाणी दिसुन येतो, त्या पाठिमागे देखिल अल्टरनॅरिया रोगाचा प्रादुर्भाव हे एक प्रमुख कारण आहे. भारतात ह्या रोगामुळे ३७ टक्के पर्यंत नुकसान ह्या रोगामुळे होत असल्याचे निर्दशनास आले आहे. वातावरणातील फेरबदल, वातावरणात वाढलेले कार्बन डाय ऑक्सिईड चे प्रमाण, मातीची क्षारता, दमट हवामान आणि महत्वाचे म्हणजे पालाश च्या कमतरतेमुळे ह्या रोगाच्या वाढीस चालना मिळते. बी टी कापसाच्या वाणांमुळे कापुस पिकावर जास्त प्रमाणात होणारी बोंड धारणा आणि त्या तुलनेत परंपरागत पध्दतीनेच दिली जाणारी पालाश खतांचा मात्रा ह्याचा सरळ परिणाम रोगाच्या वाढीवर दिसुन येतो. चीन मध्ये ह्या बाबातीत झालेल्या संशोधनाच्या आधारे, ज्या पिकात रोगाची लागण झालेली असते, त्या ठिकाणी पिकाची पालाश ग्रहण करण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा सरळ परिणाम रोगाच्या वाढीवर दिसुन येतो. ज्या ठिकाणी आधीपासुनच पिकास पालाश खतांची योग्य मात्रा दिलेली असते त्याठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात जाणुन आलेला आहे.