logo

Wet Rot| वेट रॉट

हा रोग मिरची, ढोबळी मिरची, वेल वर्गिय भाजीपाला आणि टोमॅटो पिकावर हा रोग दिसुन येतो. Choanephora cucurbitarum ह्या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाच्या वाढीसाठी ओलसर, आर्द्रतायुक्त वातावरण पोषक ठरते. ह्या रोगास कोनीफोरा ब्लाईट म्हणुन देखिल ओळखले जाते.

ही बुरशी पिकाच्या मरुन गेलेल्या भागांवर वाढते, फळांस चिकटुन राहीलेला फुलांचा भाग ज्यावेळेस मरुन जातो, त्यावेळेस त्या भागावर किंवा जमिनीवर पडलेल्या पानांवर ही बुरशी वाढते. त्यानंतर वातावरण पोषक असल्यास पिकाच्या ओलसर आणि काही प्रमाणात रोगग्रस्त भागांवर हल्ला करते. रोगाची लागण शक्यतो पिकाच्या कोवळ्या भागांवर जास्त प्रमाणात दिसुन येते. २५ ते ३० डि.से. तापमान, जास्त आर्द्रता, सततचा ओलावा, पिकाच्या मरुन गेलेल्या भागांच्या संख्येत वाढ ह्यामुळे रोगाची लागण झपाट्यात होते.

Wet Rot
Wet Rot

या रोगामध्ये पानांवर, खोडांवर, फळांवर कुज दिसुन येते. ठिपक्यांचा कडा या पिवळसर, तपकिरी, लाल रंगाच्या असतात.

पानांवर ब्लाईट सारखे डाग दिसुन येतात.

रोगाचे महत्वाचे लक्षण आहे ते बुरशी वाढते तेथे पांढ-या, चंदेरी रंगाचे सुक्ष्म केस वाढलेले दिसुन येतात.

खोडावरिल भाग हा ओलसर आणि हिरवट होते, खोडावरिल साल सहजासहजी निघुन जाते.

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी विशिष्ट असा बुरशीनाशकांची शिफारस नाही.

पिकावरिल बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणा-या बुरशीनाशकांच्या फवारणीतुन रोग नियंत्रणात मदत मिळू शकते.

बुरशीनाशकांची फवारणी घेतांना ती पिकावर एकसमान रित्या व्यवस्थित घ्यावी.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
अझोक्सिस्ट्रोबीन आंतरप्रवाही जास्त
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य कमी
डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही जास्त
बेनोमिल आंतरप्रवाही जास्त
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त