logo

फवारणीतुन खते

पिकासाठी फवारणीतुन दिली जाणारी खते हि, जमिनीतुन दिल्या जाणा-या खतांच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रभावशाली ठरतात. मातीच्या रासायनिक गुणधर्मांचा विपरित परिणाम फवारणीतुन दिल्या जाणा-या खतांवर होत नाही. तसेच पिकाच्या पानांवर, फळांवर सरळरित्या पडत असल्या कारणाने त्यांचे पासुन पिकास त्वरित फायदा मिळतो.

ढोबळी मिरची पिकाच्या खत व्यवस्थापनाशी निगडित अनेक प्रयोगातील सरासरी नुसार प्रती १००० किलो (१ मे.टन) उत्पादनासाठी पिकाव्दारा

३ ते ३.५ किलो नत्र,

०.७ ते १ किलो स्फुरद, आणि

५ ते ६ किलो पालाश

अन्नद्रव्याचे शोषण केले जाते.

त्या सोबत १.२३ ते १.५ किलो कॅल्शियम,

आणि १.१५ ते १.७ किलो मॅग्नेशियम

चे शोषण केले जाते.

ढोबळी मिरची लागवडीनंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार खालिल प्रमाणे फवारणी घ्यावी. (प्रमाण प्रती लि. पाणी) तापमान जास्त असल्यास किंवा कडक उन्हात फवारणी टाळावी. तसेच किड व रोगांच्या प्रादुर्भावानुसार तसेच वातावरणानुसार विद्राव्य खतांचे प्रमाण निम्म्याने कमी करावे.

फवारणी खतांतुन पिक संगोपन

पुर्नलागवडीनंतर दिवस खताचा प्रकार प्रमाण प्रती १ लिटर
१० ते १५ दिवस १९-१९-१९ ५ ग्रॅम
मिक्स मायक्रोन्युट्रिएंट २ ते २.५ मिली
२० ते २५ दिवस बोरॉन (२० टक्के) १ ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
चिलेटेड फेरस १ ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट २.५ ग्रॅम
फुलोरा मिळविण्यासाठी १२-६१-०० ५ ग्रॅम
००-५२-३४ ५ ग्रॅम
६ बी ए १० ते २० पीपीएम
फळ वाढीच्या काळात १३-००-४५ ५ ग्रॅम
००-००-५० ५ ग्रॅम
बोरॉन ०.५ ग्रॅम
ईडिटिए झिंक ०.५ ग्रॅम
फळांचे कॅल्शियम पोषण (गरजे नुसार) ईडिटिए कॅल्शियम १ ग्रॅम

स्थानिक परिस्थिती आणि मातीच्या अन्नद्रव्य पातळी, ढोबळी मिरची लागवडीचा हंगाम, पिकाचा वाण आणि पिकावरिल किड व रोगांचा हल्ला, आणि ईतर घटकांच्या परिणामांतुन ह्यात घट किंवा वाढ होवु शकते. ह्या बाबतीत कोणतिही जबाबदारी घेतली जात नाही ह्याची नोंद घ्यावी.

ह्या ठिकाणी देण्यात आलेली माहीती किंवा खतांचे शेड्युल हे केवळ मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. त्यात वातावरण, पिकाचा हंगाम, मातीचा प्रकार, लागवडीचा प्रकार, लागवडीचे अंतर, पिकाचा वाण, मातीतील आणि पाण्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण ह्यानुसार योग्य तो बदल करावा. लेखक कोणत्याही स्वरुपाचे कौतुक अगर आभार किंवा टिका ह्यांची अपेक्षा न ठेवता शेतकरी वर्गास मोफत माहीती देण्यात केवळ रस दाखवतात, ह्या माहीतीचा वापर केल्यानंतर उदभवणा-या कोणत्याही परिस्थितीची आम्ही कोणतिही जबाबदारी घेत नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.