logo

Pepper Mottle Virus (PepMoV)| पेपर मोटल व्हायरस

पेपर मोटल व्हायरस हा मावा किडीमुळे प्रसार पावतो. मावा किडी व्दारे ह्या व्हायरस चा प्रसार हा नॉन पर्सिटंट पध्दतीने होतो. ज्यात किड व्हायरस जास्त काळ स्वतः मधे राखुन ठेवत नाही, एकदा किडीने व्हायरस चे पिकात संक्रमण केल्यानंतर किडीस पुन्हा नवीन चार्ज मिळवावा लागतो, आणि त्यानंतरच किडीव्दारे पुढील रोपांना व्हायरस ची लागण होते.

या रोगाच्या लक्षणात पिकाची पाने पिवळसर पडतात, पानांच्या शीरा गर्द हिरव्या दिसतात. फळांना नैसर्गिक आकार प्राप्त होत नाही. पानांचा आकार बदलतो, पाने चुरडा मुरडा सारखी भासतात. लहान रोपांनी लागण झाल्यास पिकाची वाढ खुंटते.
Pepper Mottle Virus
Pepper Mottle Virus