इतर भुरीच्या बुरशीमध्ये आणि या प्रजाती मध्ये एक मुलभुत फरक असा आहे कि, ही जात पानांच्या वर न वाढता पानांच्या आत वाढत जाते. पानांच्या वरिल भागावर पांढ-या रंगाची पावडर दिसुन येते. रोगाची लागण पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होत असली तरी प्रामुख्याने फळ तयार होत असतांना व उबदार वातावरणात जास्त प्रमाणात लागण होते.

या रोगाची लागण १८ ते ३३ डि. से. तापमानात आणि कमी किंवा जास्त आद्रता असलेल्या वातावरणात देखिल होते.

Powdery Mildew

Powdery Mildew
Chemical Control | नियंत्रणाचे उपाय
बुरशीनाशकातील तांत्रिक घटक | क्रिया | प्रतिकारक शक्ती |
---|---|---|
अझाक्झिस्ट्रॉबीन | आंतरप्रवाही | जास्त |
बेनोमिल | आंतरप्रवाही | जास्त |
डिनोकॅप | स्पर्शजन्य | - |
फ्लुसिलॅझोल | आंतरप्रवाही | मध्यम |
मायक्लोब्युटॅनिल | आंतरप्रवाही | मध्यम |
ट्रायडिमेफॉन | आंतरप्रवाही | मध्यम |
हेक्झाकोनॅझोल | आंतरप्रवाही | मध्यम |
सल्फर | स्पर्शजन्य | कमी |
थायोफिनेट मिथाईल | आंतरप्रवाही | जास्त |
हेक्झाकोनॅझोल | आंतरप्रवाही | मध्यम |
पेनकोनॅझोल | आंतरप्रवाही | मध्यम |