logo

Damping Off| डँपिंग ऑफ

डँपिंग ऑफ हा रोग प्रामुख्याने रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळात दिसुन येतो. हा रोग पिथियम स्पे. या बुरशीमुळे होतो.

रोग ग्रस्त रोप उगवत नाही किंवा उगवुन आल्यानंतर कोसळुन मरुन जाते. डॅंपिंग ऑफ हे घट्ट व कडक झालेल्या जमिनीत ज्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही अशा जमिनीत जास्त प्रमाणात दिसुन येतो. तसेच रोप लागवडिच्या सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाउस झाल्यास हि समस्या जास्त प्रमाणात जाणवते.

जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते. थंड व ओल्या जमिनीतील हि एक प्रमुख समस्या आहे.

Damping Off
Damping Off

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील जमिन हवेशीर (वाफशा स्थितीत) राहील याची दक्षता घ्यावी. रोप लागवडीनंतर भरपुर पाणी देवु नये. पिकांस लागवडीच्या आधी मेटालॅक्झिल किंवा ट्रायकोडर्मा ची प्रक्रिया करुन लागवड करावी.

तसेच रोप लागवडीनंतर कॅपटन, एम ४५ चा देखिल वापर करता येईल.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
मेटालॅक्झिल आंतरप्रवाही जास्त
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त