logo

Macrophomina phaseolina| चारकोल रॉट

(Macrophomina phaseolina)

जवळपास ५०० पेक्षा अधिक पिकांवर हा रोग आढळुन येतो. या रोगाच्या वाढीसाठी ताण पडलेली रोपे, जास्त तापमान आणि कोरडे हवामान पोषक ठरते. पिकाच्या मुळाना आणि मुळांजवळील खोडांस ह्या रोगामुळे ईजा पोहचते. सोयाबीन, भुईमुग, मका, जीरे, संत्री,कोबी, ज्वारी, चवळी,बीट, रताळे, सुर्यफुल या पिकांवर देखिल हा रोग दिसुन येतो.

रोपाच्या मुळांजवळील भागात, खोडात लालसर तपकिरी रंगाची वाढ दिसुन येते. खोड आतुन चिरुन बघितली असता असा लालसर पट्टा किंवा रेष स्पष्ट पणे दिसुन येते. काही दिवसांनी हा भाग काळसर, तपकिरी रंगाचा होतो. काही वेळेस रोपाचा कॉलर रिजन (जेथे खोड मुळांस एकत्र होते तो भाग) चा भाग हा कुजतो.
Charcoal Rot
Charcoal Rot

Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी रोपांची कमी अंतरावर लागवड करु नये.

पिकांस स्फुरद व पालाश हि अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावी, जेणे करुन निरोगी वाढ मिळेल.

रोपांस नियमित पाणी द्यावे.

रोगाच्या वाढीस पोषक ठरेल अशा पिकांची लागवड करु नये.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
प्रोपीनेब स्पर्शजन्य कमी
मायक्लोब्युटॅनील आंतरप्रवाही मध्यम
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त
क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य कमी
थायोफिनेट मिथाईल स्पर्शजन्य जास्त
डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
बेनोमिल स्पर्शजन्य जास्त