logo

Bacterial Wilt | बॅक्टेरियल विल्ट

(Ralstonia solanacearum / Pseudomonas solanacearum)

रॅलस्टोनिया सोलॅनोसिरम हा एक अँरोबीक जीवाणू असुन, बॅसिलस प्रमाणे तो स्पोअर्स बनवत नाही. या जीवाणूंस सध्याच सुडोमानास असे वर्गिकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन्ही नावे प्रचलित आहेत. पिकाच्या रसवाहीन्यांवर हल्ला करतो. ढोबळी मिरचीच्या व्यतिरिक्त बटाटा, केळी, आले, टोमॅटो आणि तंबाखु पिकावर देखिल या जीवाणू मुळे होणारा हा रोग दिसुन येतो. रोगाची सुरवात ही नविन पानांपासुन होते, पान मलुल होते, पाणी कमी पडल्या मुळे जसे पान होते तसे पान होते, दिवसभर असेच राहते, मात्र संध्याकाळी रात्री त्यातुन सावरते आहे असे दिसते व पुन्हा ताजेतवाने दिसुन येते. अशी लक्षणे काही दिवस दिसल्यानंतर अचानक पुर्ण रोपच मेलेले दिसुन येते. रोगाची लागण हि शेतात ठराविक ठिकणीच मात्र विखुरलेली अशी दिसुन येते. या रोगाचे जीवाणू हे जमिनीत कोणतेही पिक नसतांना देखिल अनेक दिवस राहु शकतात. मुळांच्या द्वारे स्रवणा-या द्रवातुन देखिल हे जीवाणू जमिनीत पसरुन इतर निरोगी रोपांना ईजा पोहचवु शकतात.

जीवाणू हा मुळांवरिल जखमांमुधुनच रोपामध्ये प्रवेश मिळवतो. रोगग्रस्त रोप उपटुन टाकले तरी जमिनीत राहीलेला भाग हा नविन रोग पसरण्यास मदत करतो. ३० ते ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान आणि जमिनीतील जास्त प्रमाणातील पाणी, यामुळे रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार हा वेगाने होतो. ज्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते त्या जमिनीत रोगाची लागण व प्रसार हा जास्त प्रमाणात होतो.

Bacterial Spot
Bacterial Spot

Control | नियंत्रणाचे उपाय

ज्या जमिनीत पुर्वी रोगाची लागण झाल्याची नोंद आहे तेथे शक्यतो लागवड करु नये.

ज्या जमिनीत सुत्रकृमी आणि हुमणी यांचा त्रास असेल त्या जमिनीत या दोन्ही किडींचे नियंत्रण करावे. या किडींनी मुळांवर केलेल्या जखमांतुनच रोग रोपात प्रवेश मिळवीत असल्याने या किडींचे नियंत्रण कऱणे हा एक महत्वाचा विषय ठरतो.

शेतातील अवजारे आणि हत्यारे हि दुस-या शेतात वापरत असतांना ती निर्जंतुकीकरण केलेली असावीत.

रोग लागवड करीत असतांना रोपाच्या मुळांनी ईजा पोहचणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगाच्या प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रोप लागवड केल्यानंतर १ एकर क्षेत्रात खालिल प्रमाणे जमिनीतुन बुरशीनाशकांचा वापर करावा.

ट्रायकोडर्मा विरिडे किंवा ट्रायकोडर्मा हरजॅनियम रोप लागवड केल्या नंतर लागलीच प्रथम पाण्यासोबत एकरी २०० ग्रॅम ते २.५ किलो (लिटर) द्यावे.

रोप लागणीनंतर १०-१२ दिवसांनी जमिनीत कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०० ग्रॅम व स्ट्रेप्टोमायसिन १०० पीपीएम द्यावे.

रोप लागणीनंतर २०-२५ दिवसांनी कॅपटन २५० ग्रॅम, व मॅन्कोझेब २५० ग्रॅम द्यावे.

रोगाची लागण झाल्याची नोंद असल्यास वरिल बुरशीनाशके ५ ते ७ दिवसांच्या अंतराने १-२ वेळेस द्यावीत.

रोगाची लागण झाल्याची नोंद असल्यास रोपास थोडे दिवस पाण्याचा ताण द्यावा, व परत पाणी देतांना बुरशीनाकांचा वरिल प्रमाणे वापर करावा.

रोगाच्या जैविक नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस चा वापर हा अत्यंत फायदेशिर ठरतो, मात्र हे वापरित असतांना ५ ते ७ दिवस आधी कोणतेही जीवाणू नाशक वापरु नये. यांस कॅपटन व मॅन्कोझेब चा अपवाद आहे, यासोबत बॅसिलस सबटिलस वापरता येईल.

रोपांस भरपुर निरोगी मुळ्या राहतील यासाठी ह्युमिक अँसिड, ६ बीए, सी-विड, अँमिनो अँसिड यांचा वापर करावा.