logo

Bacterial Spot | बॅक्टेरियल स्पॉट

(Xanthomonas campestris pv. Vesicatoria)

बॅक्टेरियल स्पॉट या जीवाणू जन्य रोगाची ढोबळी मिरचीच्या नविन पानांवर जास्त प्रमाणात लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने बीज आणि रोपांकडुन जास्त प्रमाणात होतो. रोगग्रस्त बीज किंवा रोपांकडुन रोगाची लागण प्रामुख्याने होते.

या रोगाच्या वाढीसाठी 20 डीग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान जास्त लाभकारक ठरते. रोगाची लागण होण्यासाठी २४ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते, तसेच रोगाच्या वाढीसाठी २० ते ३५ डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते. रात्रीचे तापमान जर २३ ते २७ डिग्री सेल्सियस राहत असेल तर ते देखिल रोगासाठी पोषक ठरते. नत्राचा जास्त प्रमाणातील वापर हा रोगासाठी पोषक ठरतो.

Bacterial Spot
Bacterial Spot

उबदार वातावरण, पानांवरिल बाष्प, पाणी, जास्त प्रमाणातील आद्रता रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते. ज्या ठिकाणी संरक्षित वातावरणात ढोबळी मिरची ची लागवड केली जाते, तेथे फॉगर्स चा वापर, दाट लागवड, यामुळे रोपांच्या जवळील आद्रता वाढीस लागते ज्यामुळे रोगाचा प्रसार वेगाने होतो. रोगाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे हि ५ ते १० दिवसांत दिसुन येतात. हा जीवाणू जमिनीत रोप कुजुन गेल्यानंतर जीवंत राहु शकत नाही. नर्सरीमधिल रोपांच्या पानांच्या कडेस लागुन लहान आणि अनियमित रित्या पसरलेले काळसर ठिपके दिसुन येतात. मोठ्या झालेल्या रोपांच्या पानांच्या खालिल बाजुस प्रथम काळसर पाणी शोषुन घेतल्या सारखे ठिपके पडतात. अशा ठिपक्यांच्या आतिल रंग हा तपकिरी, काळसर असतो, डागाच्या कडा या पिवळसर असतात. पानांच्या वरिल बाजुस बघितल्यास हा डाग काहीसा खाली बसलेला दिसुन येतो. फळांवर, खोडावर उंचवटे असलेला डाग दिसुन येतो.

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

नर्सरी मधिल उपाययोजना

संपुर्ण पणे निर्जंतुक केलेले बीज वापरावे.

नर्सरी साठीची जागा हि निर्जंतुकिकरण केलेली असावी. त्यासाठी वाफ किंवा फ्युमिगंटस चा वापर करावा.

जेथे रोग हा कायम येत असतो अशा ठिकाणी स्ट्रेप्टोमायसिन २०० पीपीएम किंवा ब्रोमोपॉल १५० पीपीएम हे कॉपर ऑक्सिक्लोराईड १.५ ते २ ग्रॅम प्रती लि. पाण्यात घेवुन २ ते ३ वेळेस रिपिट करावे. (विशेष नोंद – स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या जास्त पातळीवरिल बुरशीनाशक आहे.)

फवारणी ही पान कोरडे असतांना व २४ तासात पाऊस येणार नाही अशा वेळेसच घ्यावी.

रोपाची पुर्नलागवड केल्यानंतर ची उपाययोजना

रोप निरोगी असेच लागवड करावे. ज्या रोपांच्या पानांच्या कडांना लागुन काळसर ठिपके दिसतात असे रोप निवडु नये.

रोपांवर लक्षणे दिसुन आल्यास कॉपर युक्त बुरशीनाशके, जसे कॉपर ऑक्सिक्लोराईड (२ ते २.५ ग्रॅम प्रती लि.) , कॉपर हायड्रॉक्साईड (२ ग्रॅम प्रती लि.) चा वापर करावा. कॉपर बुरशीनाशकांपासुन जास्त परिणाम मिळविण्यासाठी कॉपर युक्त बुरशीनाशक हे मॅन्कोझेब (१ ते २ ग्रॅम प्रती लि.) सोबत एकत्र करुन वापरावे. असे करत असतांना कॉपर बुरशीनाशक व मॅन्कोझेब हे आधीच एकत्र करुन, असे द्रावण ९० मिनीटांनी वापरावे. असे केल्याने कॉपर बुरशीनाशकांची शक्ती वाढते.

वरिल फवारणी हि २ – ३ वेळेस रिपिट करावी.

जीवाणू नाशक वापरतांना त्याची प्रतिकारक शक्ती चा अभ्यास करुनच वापरावे. (विशेष नोंद – स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या जास्त पातळीवरिल बुरशीनाशक आहे.) ब्रोमोपॉल याचा देखिल वापर करता येईल, मात्र ते वरिल कॉपर व मॅन्कोझेब च्या द्रावणात एकत्र करुन वापरते वेळी फवारणीच्या अगदी अगोदर आणि ५० ते १०० पीपीएम प्रमाणातच वापरावे.

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
कासुगामासिन आंतरप्रवाही -
व्हॅलिडामायसिन आंतरप्रवाही -
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त