कोलेक्टोट्रिकम हि बुरशी अनेक भाजीपाला पिके, कडधान्ये, फळपिके तसेच तृणधान्ये यावर रोग निर्माण करते. मिरची पिकात पानांवर, फळांवर काळसर रंगाचे ठिपके पडतात, हे ठिपके जळालेल्या डागासारखे दिसुन येतात. या ठिपक्यांच्या भोवताली लालसर, किंवा पिवळसर रंगाचे डाग दिसुन येतात. पिकाच्या वाढीच्या काळात तसेच फळ काढणीनंतर देखिल रोगाची वाढ दिसुन येते.

२७ डीग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान आणि जास्त आद्रता हे रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात. या बुरशीची प्रसार आणि पिकावर प्रथम प्रादुर्भाव करणारी कोनिडीया हि अवस्था, पिकाच्या पृष्ठभागावर गर्दी करुन जमा होते, त्यानंतर जर्म ट्युब तयार करुन पिकाच्या आत शिरते, व नंतर स्वतः ची वाढ करुन घेते.


Chemical Control | नियंत्रणाचे उपाय
रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.
बुरशीनाशकातील तांत्रिक घटक | क्रिया | प्रतिकारक शक्ती |
---|---|---|
अझोक्सिस्ट्रोबीन | आंतरप्रवाही | जास्त |
कॅपटन | स्पर्शजन्य | कमी |
कॉपर ऑक्सिक्लोराईड | स्पर्शजन्य | कमी |
कॉपर सल्फेट २.६२% | आंतरप्रवाही | कमी |
झिनेब | स्पर्शजन्य | कमी |
झायरम | स्पर्शजन्य | कमी |
क्लोरोथॅलोनिल | स्पर्शजन्य | कमी |
डायफेनकोनॅझोल | आंतरप्रवाही | मध्यम |
थायोफिनेट मिथाईल | आंतरप्रवाही | जास्त |
बेनोमिल | आंतरप्रवाही | जास्त |
मॅन्कोझेब | स्पर्शजन्य | जास्त |