logo

Cercospora Leaf Spot | सर्कोस्पोरा लिफ स्पॉट

Cercospora solani -melongenae, C. solani

या रोगाच्या सरुवातीच्या लक्षणांत, पानांवर पिवळसर ठिपके पडतात. ह्या ठिपक्यांना कित्येक वेळेस ठराविक असा आकार नसतो. कालांतराने हे ठिपके गर्द तपकिरी रंगाचे बनतात. अशा ठिपक्यांच्या मध्यभागात बुरशीचे स्पोअर्स वाढलेले देखिल दिसुन येतात. जास्त प्रादुर्भाव ग्रस्त रोपांची पाने गळुन पडतात.

Cercospora Leaf Spot
Cercospora Leaf Spot
Cercospora Leaf Spot
Cercospra Leaf Spot
Cercospora Leaf Spot
Cercospora Leaf Spot

रोगाची सुप्तावस्था ही रोगग्रस्त पिकाचे अवशेष, तसेच मातीत असते. रोगाचे स्पोअर्स (बीजाणू) हे वा-या व्दारे तसेच पाण्याच्या व्दारे उडुन, निरोगी पानांस प्रादुर्भाव करतात. रोगाची लागण झालेली असतांनाच त्या डागांतुन नवीन स्पोअर्स वाढतात व सेकंडरी प्रादुर्भाव तेथुन मोठ्या प्रमाणात वाढतो. रोगाच्या वाढीसाठी जास्त आर्द्रता युक्त वातावरण, तसेच ओली पाने मदत करतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
कासुगामासिन आंतरप्रवाही -
व्हॅलिडामायसिन आंतरप्रवाही -
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त