logo

Leaf Spot| लिफ स्पॉट

Phyl1osticta colocasiophila Weedon, Cladosporium colocasiae Sawada

अरवी पिकाच्या पानांवर दिसुन येणारे ठिपके हे फायलोस्टिका आमि क्लॅडोस्पोरियम ह्या दोन बुरशीमुळे होतात.

सततचा पाऊस आणि त्यानंतर वाहणारे थंड वारे ह्या मुळे फायलोस्टिका ह्या बुरशीमुळे होणारे पानांवरिल ठिपके ह्या रोगाचा प्रसार वेगात होतो. पानांच्या वरिल भागावर ८ ते २५ मिमी आकारेच अंडाकृती किंवा ठराविक आकार नसलेले ठिपके दिसुन येतात. जुने झालेल्या ठिपक्यांच्या भोवताली गर्द लालसर रिंग दिसुन येते, तसेच ठिपके आतिल बाजुने गर्द तपकिरी असतात.रोगाची लागण जास्त झाल्यास पानगळ देखिल होते.
Leaf Spot

क्लॅडोस्पोरियम ह्या बुरशीमुळे होणा-या रोगात पानांच्या खालिल बाजुस तपकिरी ठिपके दिसुन येतात, हे ठिपके पानांच्या वरिल बाजुस हलक्या पिवळसर रंगाचे असतात.

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
अझोक्सिस्ट्रोबीन आंतरप्रवाही जास्त
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य कमी
डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही जास्त
बेनोमिल आंतरप्रवाही जास्त
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त