logo

पिटी आणि ऑरगॅनिक साईल (सेंद्रिय पदार्थांनी युक्त जमिन)

पिटी आणि ऑरगॅनिक साईल (सेंद्रिय पदार्थांनी युक्त जमिन) या प्रकारच्या जमिनी या लागवडीसाठी योग्य अशा नाहीत त्यामुळे त्याबाबत चर्चा करण्यात अर्थ नाही. पैकी पिटी (Peaty) आणि ऑरगॅनिक स्वरुपाच्या जमिनी या केरळ, बंगाल चा किनारपट्टीचा भाग, ओरीसा, तमिळनाडुचा पुर्व व दक्षिण भाग येथे आढळुन येतात. भरपुर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असुन देखिल या जमिनी ईतर पिकांसाठी उपयुक्त ठरत नाहीत. प्रामुख्याने भात शेती तेवढी काही भागात होते. आता पर्यंत आपण जमिनींचे मुलभुत प्रकार कोणते आहेत या बाबत माहीती जाणून घेतली. तिचा सारांश पुढील प्रमाणे

प्रकार क्ले स्लिट सॅण्ड सेद्रिय कर्ब सी.ई.सी. पीएच
अँल्युव्हियल माती 30-40% 20-30% 10-15% 0.1-2% 3-12 meq/100g ६ ते ८.०
काळी माती 30-69% 26-40% 4-25% 0.1 to 5% 47-65 meq/100g ७.५ ते ८.५
लाल माती 14-53% 4-19% 35-76% 1-2% 5 to 26 meq/100g ७ पेक्षा कमी

आपल्याला निसर्गाने ज्यावेळेस जमिन दिली आणि माती दिली त्यावेळेस ती वरिल गुणधर्म नैसर्गिक रित्या असलेली अशीच दिली.

अँल्युव्हीयल आणि काळी माती या दोन गटात प्रामुख्याने महाराष्ट्राची पठारी भागातील शेती विभागलेली आहे. त्यातल्या त्यात काळी माती चे प्रमाण जास्त आहे. वरिल टेबल मधे या सर्वच मातींचा तुलनात्मक असा तक्ता दिलेला आहे.

अँल्युव्हीयल आणि काळी माती ही प्रामुख्याने ६ ते ८.५ पर्यंत पीएच असलेल्या अशा आहेत. आणि हे असे नैसर्गिक गुणधर्मा मुळे आहे. अगदी आपल्या वाडवडलांच्या काळात देखिल त्यांचे नैसर्गिक गुणधर्म हे असेच होते.

ज्या जमिनीत क्ले चे प्रमाण हे जास्त आहे त्या जमिनींची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटि देखिल जास्त आहे. तर ज्या मिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण (सेद्रिय कर्ब हे त्याचे अंतिम स्वरुप) जास्त आहे तेथे मातीचा सामु देखिल हा नियंत्रित अशा प्रमाणातच आहे.

केवळ काळ्या माती मध्ये काही ठिकाणी सेंद्रिय कर्ब हे जास्त असुन देखिल तेथे काही ठिकाणी पीएच हा ८.५ पर्यंत आहे. हे असे होते ते काळ्या जमिनीतील कॅल्शियम कार्बोनेट च्या वाढीव प्रमाणामुळे.

हि माहीती आपण शेती बाबतीत करित असलेल्या सर्वच उपाययोजना, खत व्यवस्थापन, पिकाची निवड, तसेच रसायनिक किटक नाशके, बुरशीनाशके आणि तण नाशके यांच्या वापरा बाबतीत निर्णय घेण्यासाठी मदत करतील.