logo

हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा

हेलिकोव्हर्पा अर्मिजेरा ही अळी शेतात होणा-या जवळपास एकुणएक पिकावर दिसुन येते. कापुस, सोयाबीन, तुर, भुईमुग, टोमॅटो, मिरची, भेंडी, कोबी, फ्लावर, मका, फळ झाडे आदी सर्वच पिकांवर हि किड दिसुन येते.

फळे पोखरणे, शेंडा पोखरणे, पाने कुरतडणे आदी प्रताप हि किड करत असते. एका हंगामात तापमान समाधानकारक राहीले तर हि किड दर ३५ ते ४० दिवसांत एक पिढि पुर्ण करते, अशा ३ ते ४ पिढ्या होतात.

या किडीला उडण्याची क्षमता फार आहे त्यामुळे जास्तीत जास्त परिसर प्रभावीत करु शकते. मादी तिच्या जीवन क्रमात १००० ते १२०० अंडी देते. अंडी हि कोवळ्या पानांनर, कळ्यांवर, फळांच्या देठाशी दिली जातात. अंडी सुरवातीला पांढरी असतात, कालांतराने ती पिवळसर अशा रंगाची (काजु रंग) होतात.

अळी साधारण ६ अवस्थेत जावुन सुप्तावस्थेत जाते, कोषावस्था हि जमिनीत किंवा फळात पुर्ण केली जाते.

अळी नियंत्रणासाठी योग्य किटकनाशक एकत्र करुन किंवा एकटे वापरणे गरजेचे असते.

अळी नियंत्रणासाठी पायरेथ्राईड गटातील किटकनाशके हि अळी ७ मिमी पेक्षा कमी आकाराची असतांनाच त्यांचा वापर केल्यास जास्त फायदेशीर ठरते.

अंडी नाशक किंवा अळी लहान असतांनाच मिथोमिल चा वापर फायदेशिर ठरतो.

लागवडीच्या सुरवातीच्या काळात ऑरगॅनोफॉस्फेटस चा वापर उपयुक्त किडींसाठी हानीकारक ठरतो.

या अळीच्या नियंत्रणासाठी प्रौढ किड शेतात दिसल्यानंतर लागलीच अंडी नाशक जसे मिथोमिल चा वापर करावा. अळीच्या सुरवातीच्या काळात सिथेंटिक पायरॅथ्राईडस चा वापर करुन घ्यावा. शेतातील पंतग पकडण्यासाठी शेतात फेरोमोन ट्रॅप ठेवावेत.

किडीची अंडी देण्याची क्षमता फार जास्त असल्याने एकदा फवारणी केल्यानंतर ती संपुर्ण पणे नष्ट होईल याची खात्री नाही, कारण नविन प्रजा पुन्हा तयार होत असते.

अळी मोठी झाल्यानंतर ती सिंथेटिक पायरॅथ्राईडस ने नियंत्रणात येणे कठिण जाते.

Helicoverpa armigera
Helicoverpa armigera-Pupa(Img source:pyrgus.de)
Helicoverpa armigera-Adult(Img source:Agroatlas)