logo

बुरशीनाशके

फ्लुसिलॅझोल 40% EC ग्रुप ३ I आंतरप्रवाही

व्यापारी नांव न्युस्टार
वर्गिकरण डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर)
रासायनिक गट ट्रायझोल्स
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 3
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका  मध्यम
एम ओ ए (MOA) कोड पेशी भित्तिकेतील स्टेरॉल ची निर्मिती
कार्य प्रकार आंतरप्रवाही

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष भुरी 0.004%
सफरचंद स्कॅब 0.004%
भात शिथ ब्लाईट ०.६ मिली
मिरची भुरी ०.३ मिली

कार्यपद्धती

फ्लुसिलॅझोल हे संरक्षणात्मक आणि उपचारात्मक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. पावसामुळे रि-डिस्ट्रिब्युट (पुर्न वितरित) होते आणि वाहुन जाण्यास प्रतिकारक आहे. वाफ स्वरुपातील क्रिया असल्याने अधिक परिणामकारक ठरते. फ्लुसिलॅझोल स्टेरॉल निर्मिती थाबंवते ज्यामुळे बुरशीच्या पेशी भित्तिका व्यवस्था निर्मिती यावर वाईट परिणाम होतो.

पर्यावरण व दक्षता

फ्लुसिलॅझोल चा वापर हा रोगाच्या जीवनक्रमात लवकर करावा. एका हंगामात ४ पेक्षा जास्त वेळेस वापरक करु नये. फवारणी केलेल्या क्षेत्रातील पाने जनावरांस खाण्यास देवु नये. एफआरएसी नुसार रोगांच्या बुरशीमध्ये या बुरशीनाशकाच्या प्रती प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका आहे. रोगग्रस्त भागावरिल एकुण बुरशीच्या संख्ये पैकि काहीं बुरशी ह्या बुरशीनाशकांस प्रतिकारक असु शकतात, अशा वेळेस हे बुरशीनाशक वापरुन नियंत्रण न झाल्यास किंवा अशा वेळेस पुर्ण नियंत्रण होणे याची शक्यता कमी असते, त्यामुळे पुन्हा वापर करु नये तसेच या गटतील इतर कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल.