logo

बुरशीनाशके

डायमिथोमॉर्फ ग्रुप 40 I स्थानिक आंतरप्रवाही

व्यापारी नांव अक्रोबॅट
वर्गिकरण सीएए- बुरशीनाशक कार्बाक्झिलिक असिड अमाईडस
रासायनिक गट सिन्नामिक असिड अमाईड्स
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 40
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका कमी ते मध्यम
एम ओ ए (MOA) कोड एच पेशी भित्तिका निर्मिती
कार्य प्रकार स्थानिक आंतरप्रवाही बुरशीनाशक

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष डाऊनी मिल्डयु (Plasmopara viticola) १.२५ ग्रॅम
बटाटा लेट ब्लाईट (Phytophthora infestans) १.२५ ग्रॅम

कार्यपद्धती

डायमिथोमॉर्फ हे आंतर प्रवाही बुरशीनाशक आहे. डायमिथोमॉर्फ बुरशीनाशक पिकाचे, वॉटर मोल्ड गटातील बुरशी जसे – बटाट्या वरिल लेट ब्लाईट व द्राक्षावरिल डाऊनी मिल्ड्यु रोगांपासुन संरक्षण करते. पिकाच्या खोडांत खालुन वरच्या दिशेने प्रवास करते, आणि नविन वाढींमध्ये जावुन पोहचते. डायमिथोमॉर्फ बुरशीद्वारा नविन स्पोअर्स (बीजाणू) च्या निर्मितीवर देखिल निर्बंध आणते. स्टिरॉल ची निर्मिती थांबवुन बुरशीच्या पेशीची पेशी भित्तिका निर्माण होण्यापासुन प्रतिबंध करते.

पर्यावरण व दक्षता

रोगाची लागण होण्याच्या अगोदर, आसपासच्या शेतांत लागण झाल्यानंतर आणि रोगाची लागण होत असतांना लवकरात लवकर वापर करावा. उत्पादनाच्या लेबल वरिल शिफारसी नुसार ५ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी पुन्हा घ्यावी. डायमिथोमॉर्फ हे लक्षणिय रित्या त्वचेस हानी पोहचवते त्यामुळे काळजीपुर्वक वापर करावा. एका हंगामात २ पेक्षा जास्त फवारणी घेवु नये.