logo

बुरशीनाशके, त्यांची कार्यपद्धती, प्रतिकारक शक्ती या विषयी माहीती

बुरशीनाशके वापरत असतांना शेतक-यांस अनेक वेळेस एखाद्या उत्पादनाचे रिझल्ट कधी फार चांगले मिळतात, तर कधी मिळत नाहीत. तसेच एखाद्या बुरशीनाशकाचा उत्तम रिझल्ट मिळाल्यास शेतकरी त्याच उत्पादनाचा सतत वारंवार वापर करित राहतात, आणि त्याच्या नंतर त्या उत्पादनाचा रिझल्ट मिळत नाही. हे असे का होते याचा विचार केल्यास आपणास लक्षात येते कि, बुरशीनाशकांच्या प्रती रोगांत प्रतिकारक शक्ती निर्माण होत असते, आणि हि प्रतिकारक शक्ती निर्माण होणे आता जाणुन घेता येते, हि माहीत आता शेतक-यांसाठी उपल्बध असुन त्याचा वापर योग्यरित्या केल्यास नक्किच फायदा होईल.

बुरशीनाशकांचा वापर हा जागतिक अन्न, फळे, भाजीपाला, व धान्य उत्पादनात महत्वाची भुमिका पार पाडतो. एफ.ए. आर.सी. ही संस्था पुर्वी ग्लोबल क्रॉप प्रोटेक्शन फेडरेशन (जी.सी.पी.एफ.) म्हणुन ओळखळी जाणा-या (सध्या – क्रॉप लाईफ इंटरनॅशनल) या संस्थेचा एक तज्ञ विभाग आहे. एफ.ए.आर.सी. म्हणजे फंजीसाईड रसिसटंस एक्शन कमिटी. ब्रुसेल्स येथे १९८१ साली झालेल्या जागतिक चर्चा सत्रात एफएआऱसी ची स्थापना झाली. ह्या चर्चा सत्रात ६८ शास्रज्ञ आणि जगभरातुन ३५ शेती कंपन्यांचे मार्केटिंग मॅनेजर उपस्थित होते. हि संस्था जगभरात बुरशीनाशकांच्या प्रती बुरशींमध्ये, जीवाणूंमध्ये निर्माण होणा-या प्रतिकारक शक्ती बाबत संशोधन करुन त्याचा अहवाल वेळोवेळी प्रकाशित करीत असते. संस्थेने बुरशीमधिल प्रतिकारक शक्ती नुसार विविध गट तयार केलेत आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला. आज जगभरात हे संशोधन मान्यता प्राप्त आहे. या संशोधनाचा वापर करुन बुरशीनाशकांचा वापर योग्य रित्या करुन रोगाच्या मध्ये प्रतिकारक शक्ती निर्मिण होणार नाही याची दक्षता देखिल घेतली जाते.

एफ. आर. ए. सी. द्वारा बुरशीनाशकांस देण्यात आलेले नंबर्स आणि अक्षरे हि बुरशीनांशकांप्रती असलेली परस्पर (क्रॉस रसिटंस) प्रतिकार शक्ती अर्थात एका गटातील बुरशीनाशकांस प्रतिकारक असल्यास त्याच गटातील दुस-या किंवा इतर गटातील बुरशीनाशकाच्या विरुद्ध देखिल प्रतिकारक असणे, यानुसार देण्यात आलेली आहेत.

नंबर सर्वसाधारण पणे बुरशीनाशक कीती काळापासुन बाजारात आहे, यानुसार देण्यात आले आहे,

तर अक्षरे हि बुरशीनाशकाच्या कार्यपद्धती नुसार जसे , पी – वापर केल्या जाणा-या पिकात प्रतिकारक शक्ती वाढवणे, एम – मल्टी साईट इनहिबीटर (बुरशीच्या पेशीत विविध ठिकाणी कार्य), यु – कार्य पध्दती बाबत माहीती उपलब्ध नाही, या प्रमाणे देण्यात आलेली आहे.

  • एखादे बुरशीनाशक वापरुन रोग नियंत्रित न झाल्यास त्या गटातील इतर बुरशीनाशकांचा देखिल वापर करु नये.
  • कमी प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली बुरशीनाशके वापरण्यास कमी धोके दायक आहेत. तरी जास्त वेळेस वापर करु नये.
  • साधारणपणे नविन आलेली जवळपास सर्वच बुरशीनाशके हि जास्त धोकेदायक (रोगांत प्रतिकार शक्ती निर्माण होणे) आहेत, त्यामुळे वारंवार वापर करु नये.

एफ. आर. ए. सी. द्वारा हि माहीती जनहीतार्थ जारी केली जाते, या माहीती चा वापर शैक्षणिकदृष्ट्याच करावा. व्यापारी उद्देशासाठी वापर करण्यापुर्वी एफ. आर. ए. सी. ची लेखी परवागनी घेणे आवश्यक आहे. येथिल सर्व माहीती एफ. आर. ए. सी. च्या अधिकृत वेबसाईट वरुन घेतलेली आहे. माहीती फेब्रुवारी २०१३ च्या नुसार, प्रचलित माहीतीसाठी कृपया एफ. आर. ए. सी. ची वेबसाईट बघावी.

महत्वाचे - याठीकाणी देण्यात आलेली माहीती ही एफआरएसी च्या फेब्रुवारी २०१३ च्या बुलेटिन नुसार आहे. तसेच या ठिकाणी देण्यात आलेली बुरशीनाशकांची व्यापारी नावे हि केवळ संदर्भासाठी आहेत, आम्ही कोण्त्याही व्यापारी नावाचा येथुन प्रचार करित नाही. बाजारात सदरिल बुरशीनाशके इतरही अनेक व्यापारी नावाने उपलब्ध आहेत.

एफ ए आर सी कोड ग्रुपचे नाव केमिकल ग्रुप तांत्रिक घटक व्यापारी नांव वहनशिलता कार्यपद्धती रोगामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका
३३ फॉस्फोनेट इथिल फॉस्फोनेटस् फॉसेटिल – एएल अलिएट पिकांत दोन्ही दिशेने वहनशील ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरोरीलेशन थांबवते कमी
३३ फॉस्फोनेट फॉस्फोनेट फॉस्फोरस असिड   पिकांत दोन्ही दिशांनी वहनशील ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरोरीलेशन थांबवते कमी
एम १ इनऑरगॅनिक्स इनऑरगॅनिक्स कॉपर सल्फेट, कॉपर ऑक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड ब्लु कॉपर,कोसाईड स्पर्शजन्य एन्झाईम्स ची निर्मिती, उर्जा वहन (अन्न वहन) यात बिघाड निर्माण करते.  कमी
एम २ इनऑरगॅनिक्स इनऑरगॅनिक्स सल्फर सल्टाफ स्पर्शजन्य इलेक्ट्रॉन चे वहन थांबवते, ज्यामुळे अन्ननिर्मीती थांबवते. कमी
एम ३ डायथायोकार्बामेट डायथायोकार्बामेट मॅन्कोझेब, मॅनेब मॅन्कोझेब, मॅनेब स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम  ३ डायथायोकार्बामेट डायथायोकार्बामेट थायरम थायरम स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम ४ क्लोरोअल्किथिऑस क्लोरोअल्किथिऑस कॅपटन कॅपटन स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम ५ क्लोरोनायट्रील क्लोरोनायट्रील क्लोरोथॅलोनील कवच स्पर्शजन्य श्वसनात बिघाड निर्माण करते, बहुविध कमी
एम ३ डायथायोकार्बामेट डायथायोकार्बामेट प्रोपीनेब अन्ट्राकॉल स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम ३ डायथायोकार्बामेट डायथायोकार्बामेट मेटिराम पॉलीराम स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम ३ डायथायोकार्बामेट डायथायोकार्बामेट झिनेब   स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम ३ डायथायोकार्बामेट डायथायोकार्बामेट झायरम कुमान एल स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एम ९ क्विनोन (अँथ्रा क्विनोन्स) क्विनोन (अँथ्रा क्विनोन्स) डायथिएनॉन डेलन  स्पर्शजन्य मल्टी साईट एक्टिव्हीटी कमी
एफ ए आर सी कोड ग्रुपचे नाव केमिकल ग्रुप तांत्रिक घटक व्यापारी नांव वहनशिलता कार्यपद्धती रोगामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका
४० सीएए- बुरशीनाशक कार्बाक्झिलिक असिड अमाईडस सिन्नामिक असिड अमाईड्स डायमिथोमॉर्फ अक्रोबॅट स्थानिक आंतर प्रवाही बुरशीच्या पेशी भित्तिकेवर कार्य करीत असल्याचा अंदाज कमी ते मध्यम
फॉस्फोरोथायोलेटस फॉस्फोरोथायोलेटस इडिफेनफॉस हिनोसान  आंतरप्रवाही लिपिड निर्मिती आणि भित्तिका सशक्त राहणे यावर हल्ला कमी ते मध्यम
स्टिरॉल बायोसिंथेसिस इनहिबिटर – एस.बी.आय. क्लास ३, ३-केटो रिडक्डेस, सी४, डी मिथिलेशन हायड्रॉक्झिअनिलिड्स फेनहेक्झामिड टेलडोर स्थानिक आंतर प्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. कमी ते मध्यम
४० सीएए- बुरशीनाशक कार्बाक्झिलिक असिड अमाईडस  मँडेलिक असिड अमाईड्स मँडिप्रोप्रॅमिड रिव्हस स्थानिक आंतर प्रवाही बुरशीच्या पेशी भित्तिकेवर कार्य करीत असल्याचा अंदाज कमी ते मध्यम
२७ सायनोअसिटामाईड- ऑक्जिम सायनोअसिटामाईड- ऑक्जिम सायमॉक्झानील कर्झेट   कार्य पद्धती बाबत निश्चित माहीती नाही कमी ते मध्यम
एफ ए आर सी कोड ग्रुपचे नाव केमिकल ग्रुप तांत्रिक घटक व्यापारी नांव वहनशिलता कार्यपद्धती रोगामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका
मिथिल बेन्झोमिडॅझोल कार्बामेट (एमबीसी) थायोफिनेटस् थायोफिनेट मिथाईल टॉपसीन, रोको रसवाहीन्यात वहनशील बहु विध, पेशी विभाजन थांबवते जास्त
फिनिलअमाईड (पीए) फिनिलअमाईड मेफोनॉझ्काम (मेटालॅक्झिल – एम) रिडोमील गोल्ड, अप्रन रसवाहीन्यात वहनशील उमायसिटस् विरुद्ध प्रभावशाली, आर.एन.ए. निर्मिती थांबवते जास्त
११ क्विनोन आउट साईड इनहिबीटर स्ट्रोब्युलिन अझोक्सोस्ट्रोबीन अमिस्टार रसवाहीन्यात वहनशील श्वसन (अन्ननिर्मिती) बंद पाडते. बहुविध क्रिया जास्त
११ क्विनोन आउट साईड इनहिबीटर मिथॉक्झि कार्बामेटस् पायरॅक्लोस्ट्रोबीन कॅब्रिईओ, हेडलाईन स्थानिक आंतरप्रवाही श्वसन (अन्ननिर्मिती) बंद पाडते. बहुविध क्रिया जास्त
२५ ग्लुकोपायरॅनोसोल अन्टीबायोटीक स्ट्रेप्टोमायसिस स्ट्रेप्टोमायसीन   रसवाहीन्यात वहनशील एकाच ठिकाणी कार्य करते, जीवाणूनाशक जास्त
फिनिल अमाईड असिलॅलिनाईन्स मेटालॅक्झिल रिडोमिल स्थानिक आंतर प्रवाही न्युक्लिक असिड निर्मिती जास्त
मिथिल बेन्झीमिडॅझोल कार्बामेटस् बेन्झीमिडॅझोल बेनोमिल बेनोमिल आंतर प्रवाही मायटॉसीस (पेशी विभाजन) मधिल बीटा- टयुबिलीन असेम्बेली  जास्त
मिथिल बेन्झीमिडॅझोल कार्बामेटस् बेन्झीमिडॅझोल कार्बेन्डाझिम बाविस्टीन आंतर प्रवाही मायटॉसीस (पेशी विभाजन) मधिल बीटा- टयुबिलीन असेम्बेली  जास्त
मिथिल बेन्झीमिडॅझोल कार्बामेटस् बेन्झीमिडॅझोल थायबेन्डाझोल     मायटॉसीस (पेशी विभाजन) मधिल बीटा- टयुबिलीन असेम्बेली  जास्त
११ क्विनोन आउट साईड इनहिबीटर ऑक्झिमिनो असिटेटस क्रेसोक्झिम-मिथिल एलेग्रो,सिग्नस आंतरप्रवाही श्वसन (अन्ननिर्मिती) बंद पाडते. बहुविध क्रिया जास्त
११ क्विनोन आउट साईड इनहिबीटर ऑक्झोलिडीन-डायोन्स फेमाक्झोडोन इक्वेशन प्रो (सायमॉक्झानिल सोबत) स्पर्श जन्य श्वसन (अन्ननिर्मिती) बंद पाडते. बहुविध क्रिया जास्त
११ क्विनोन आउट साईड इनहिबीटर इमिडाझोलिनोन्स फेनामिडोन सेक्टिन (मॅन्कोझब सोबत) आंतरप्रवाही सी: श्वसनांत कार्य करते (Respiration) जास्त
११ क्विनोन आउट साईड इनहिबीटर ऑक्झिमिनो असिटेटस् ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबीन नेटिवो (टेब्युकोनॅझोल सोबत) स्थानिक आंतर प्रवाही सी: श्वसनांत कार्य करते (Respiration) जास्त
एफ ए आर सी कोड ग्रुपचे नाव केमिकल ग्रुप तांत्रिक घटक व्यापारी नांव वहनशिलता कार्यपद्धती रोगामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका
डि एम आय पीप्रेझीन मायक्लोब्युटॅनील सिस्थेन रसवाहीन्यात वहनशील बहु विध, स्टेरॉल ची जैव निर्मिती थांबवते. मध्यम
डि एम आय ट्रायझोल टेब्युकोनॅझोल फॉलीक्युर रसवाहीन्यात वहनशील बहु विध, स्टेरॉल ची जैव निर्मिती थांबवते. मध्यम
कार्बाक्झामाईड ऑक्झाथीन कार्बाक्झीन विटावॅक्स स्थानिक आंतरप्रवाही बॅसिडोमायसिटस् विरुद्ध प्रभावाशाली, श्वसन (अन्ननिर्मिती) बंद पाडते. मध्यम
२४ डि ३, प्रोटिन सिंथेसिस हेक्झापायरॅनोसोल अन्टिबायोटिक कासुगामायसिन ओमायसिन आंतरप्रवाही अमिनो असिड आणि प्रोटिन निर्मिती वर हल्ला मध्यम
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) ट्रायझोल्स बिट्रेटिनॉल बेकॉर स्पर्शजन्य स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) ट्रायझोल्स डायफेनकोनॅझोल स्कोर आंतरप्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) ट्रायझोल्स फ्लुसिलॅझोल न्युस्टार आंतर प्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) ट्रायझोल्स हेक्झालकोनॅझोल कॅपटाफ, डॅनझोल, डॅनझोल प्लस आंतर प्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) ट्रायझोल्स पेनकोनॅझोल टोपास आंतर प्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) ट्रायझोल्स प्रोपिकोनॅझोल टिल्ट आंतर प्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
डि.एम.आय. (डिमिथिलेशन इनहिबटर) (स्टिरॉल बायोसिंथेसिस इनहिबिटर – एस.बी.आय.) ट्रायझोल्स ट्रायडिमेफॉन बेलेटॉन आंतरप्रवाही स्टेरॉल ची निर्मिती थांबवते. मध्यम 
 डि एम आय बुरशीनाशक (डि मिथिलेशन इनहिबिटर) एसबीआय क्लास - १ पायरिमिडिन्स फेनारिमोल रुबीगन स्थानिक आंतरप्रवाही पेशी भित्तिकेतील स्टेरॉल ची निर्मिती मध्यम 
एफ ए आर सी कोड ग्रुपचे नाव केमिकल ग्रुप तांत्रिक घटक व्यापारी नांव वहनशिलता कार्यपद्धती रोगामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका
डायकार्बामेट डायकार्बाक्झिमाईड इप्रिडिऑन रोव्हारॉल स्पर्शजन्य बहु विध, एनएडीएच सायटोक्रोम सी  मध्यम ते जास्त
२६ ग्लुकोपायरॅनोसिल अन्टिबायोटिक ग्लुकोपायरॅनोसिल अन्टिबायोटिक व्हॅलिडामायसिन व्हॅलिडामायसिन आंतर प्रवाही   माहीती उपलब्ध नाही.
१६.१ एमआयबी-आर मॅलेनिन बायोसिंथेसिस इनहिबिटर – रिडक्टेज ट्रायझोलबेन्झो-थायोझोल ट्रायसाक्लाझोल ब्लास्टऑफ आंतर प्रवाही बुरशीच्या पेशी भित्तिकेवर कार्य करीत असल्याचा अंदाज माहीती उपलब्ध नाही.
१६.२ एमआयबी - डी मॅलेनिन बायोसिंथेसिस इनहिबिटर – डिहायड्राटेज सायक्लोप्रोपेन- कार्बाक्झिमेड कॅप्रोपॅमिड   आंतर प्रवाही बुरशीच्या पेशी भित्तिकेवर कार्य करीत असल्याचा अंदाज माहीती उपलब्ध नाही.
२९ - डायनायट्रोफिनिल क्रोटोनेट्स डिनोकॅप केराथेन (मॅन्कोझेब सोबत डिकार) स्पर्शजन्य बुरशीनाशक, कोळीनाशक गुणधर्म देखिल आहेत C: श्वसन क्रिया (Respiration) माहीती उपलब्ध नाही.