ढोबळी मिरची पिक संरक्षण

बॅक्टेरियल स्पॉट बॅक्टेरियल विल्ट क्राऊन गॉल
अँन्थ्रॅक्नोज सर्कोस्पोरा लिफ स्पॉट चारकोल रॉट
वेट रॉट मुळ कुज, क्राऊन रॉट व्हर्टिसिलियम विल्ट
पावडरी मिल्ड्यु (भुरी) कर्ली टॉप व्हायरस ककुंबर मोझॅक व्हायरस
डँपिंग ऑफ

बॅक्टेरियल स्पॉट (Xanthomonas campestris pv. Vesicatoria)

capcicum, agriplaza, agriculture informationबॅक्टेरियल स्पॉट
capcicum, agriplaza, agriculture informationबॅक्टेरियल स्पॉट

बॅक्टेरियल स्पॉट या जीवाणू जन्य रोगाची ढोबळी मिरचीच्या नविन पानांवर जास्त प्रमाणात लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने बीज आणि रोपांकडुन जास्त प्रमाणात होतो. रोगग्रस्त बीज किंवा रोपांकडुन रोगाची लागण प्रामुख्याने होते. या रोगाच्या वाढीसाठी 20 डीग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमान जास्त लाभकारक ठरते.

रोगाची लागण होण्यासाठी २४ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते, तसेच रोगाच्या वाढीसाठी २० ते ३५ डिग्री सेल्सियस तापमान पोषक ठरते. रात्रीचे तापमान जर २३ ते २७ डिग्री सेल्सियस राहत असेल तर ते देखिल रोगासाठी पोषक ठरते. नत्राचा जास्त प्रमाणातील वापर हा रोगसाठी पोषक ठरतो.

 • उबदार वातावरण, पानांवरिल बाष्प, पाणी, जास्त प्रमाणातील आद्रता रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते.
 • ज्या ठिकाणी संरक्षित वातावरणात ढोबळी मिरची ची लागवड केली जाते, तेथे फॉगर्स चा वापर, दाट लागवड, यामुळे रोपांच्या जवळील आद्रता वाढीस लागते ज्यामुळे रोगाचा प्रसार वेगाने होतो.
 • रोगाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे हि ५ ते १० दिवसांत दिसुन येतात.
 • हा जीवाणू जमिनीत रोप कुजुन गेल्यानंतर जीवंत राहु शकत नाही.
 • नर्सरीमधिल रोपांच्या पानांच्या कडेस लागुन लहान आणि अनियमित रित्या पसरलेले काळसर ठिपके दिसुन येतात.
 • मोठ्या झालेल्या रोपांच्या पानांच्या खालिल बाजुस प्रथम काळसर पाणी शोषुन घेतल्या सारखे ठिपके पडतात. अशा ठिपक्यांच्या आतिल रंग हा तपकिरी, काळसर असतो, डागाच्या कडा या पिवळसर असतात.
 • पानांच्या वरिल बाजुस बघितल्यास हा डाग काहीसा खाली बसलेला दिसुन येतो.
 • फळांवर, खोडावर उंचवटे असलेला डाग दिसुन येतो.

उपाययोजना –

नर्सरी मधिल उपाययोजना -

 • संपुर्ण पणे निर्जंतुक केलेले बीज वापरावे.
 • नर्सरी साठीची जागा हि निर्जंतुकिकरण केलेली असावी. त्यासाठी वाफ किंवा फ्युमिगंटस चा वापर करावा.
 • जेथे रोग हा कायम येत असतो अशा ठिकाणी स्ट्रेप्टोमायसिन २०० पीपीएम किंवा ब्रोमोपॉल १५० पीपीएम हे कॉपर ऑक्सिक्लोराईड १.५ ते २ ग्रॅम प्रती लि. पाण्यात घेवुन २ ते ३ वेळेस रिपिट करावे. (विशेष नोंद – स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या जास्त पातळीवरिल बुरशीनाशक आहे.)
 • फवारणी ही पान कोरडे असतांना व २४ तासात पाऊस येणार नाही अशा वेळेसच घ्यावी.

रोपाची पुर्नलागवड केल्यानंतर ची उपाययोजना –

 • रोप निरोगी असेच लागवड करावे. ज्या रोपांच्या पानांच्या कडांना लागुन काळसर ठिपके दिसतात असे रोप निवडु नये.
 • रोपांवर लक्षणे दिसुन आल्यास कॉपर युक्त बुरशीनाशके, जसे कॉपर ऑक्सिक्लोराईड (२ ते २.५ ग्रॅम प्रती लि.) , कॉपर हायड्रॉक्साईड (२ ग्रॅम प्रती लि.) चा वापर करावा. कॉपर बुरशीनाशकांपासुन जास्त परिणाम मिळविण्यासाठी कॉपर युक्त बुरशीनाशक हे मॅन्कोझेब (१ ते २ ग्रॅम प्रती लि.) सोबत एकत्र करुन वापरावे. असे करत असतांना कॉपर बुरशीनाशक व मॅन्कोझेब हे आधीच एकत्र करुन, असे द्रावण ९० मिनीटांनी वापरावे. असे केल्याने कॉपर बुरशीनाशकांची शक्ती वाढते.
 • वरिल फवारणी हि २ – ३ वेळेस रिपिट करावी.
 • जीवाणू नाशक वापरतांना त्याची प्रतिकारक शक्ती चा अभ्यास करुनच वापरावे. (विशेष नोंद – स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याच्या जास्त पातळीवरिल बुरशीनाशक आहे.) ब्रोमोपॉल याचा देखिल वापर करता येईल, मात्र ते वरिल कॉपर व मॅन्कोझेब च्या द्रावणात एकत्र करुन वापरते वेळी फवारणीच्या अगदी अगोदर आणि ५० ते १०० पीपीएम प्रमाणातच वापरावे.

बॅक्टेरियल विल्ट (Ralstonia solanacearum / Pseudomonas solanacearum)

capcicum, agriplaza, agriculture informationबॅक्टेरियल विल्ट

रॅलस्टोनिया सोलॅनोसिरम हा एक अँरोबीक जीवाणू असुन, बॅसिलस प्रमाणे तो स्पोअर्स बनवत नाही. या जीवाणूंस सध्याच सुडोमानास असे वर्गिकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन्ही नावे प्रचलित आहेत. पिकाच्या रसवाहीन्यांवर हल्ला करतो. ढोबळी मिरचीच्या व्यतिरिक्त बटाटा, केळी, आले, टोमॅटो आणि तंबाखु पिकावर देखिल या जीवाणू मुळे होणारा हा रोग दिसुन येतो. रोगाची सुरवात ही नविन पानांपासुन होते, पान मलुल होते, पाणी कमी पडल्या मुळे जसे पान होते तसे पान होते, दिवसभर असेच राहते, मात्र संध्याकाळी रात्री त्यातुन सावरते आहे असे दिसते व पुन्हा ताजेतवाने दिसुन येते. अशी लक्षणे काही दिवस दिसल्यानंतर अचानक पुर्ण रोपच मेलेले दिसुन येते. रोगाची लागण हि शेतात ठराविक ठिकणीच मात्र विखुरलेली अशी दिसुन येते.

या रोगाचे जीवाणू हे जमिनीत कोणतेही पिक नसतांना देखिल अनेक दिवस राहु शकतात. मुळांच्या द्वारे स्रवणा-या द्रवातुन देखिल हे जीवाणू जमिनीत पसरुन इतर निरोगी रोपांना ईजा पोहचवु शकतात.

जीवाणू हा मुळांवरिल जखमांमुधुनच रोपामध्ये प्रवेश मिळवतो. रोगग्रस्त रोप उपटुन टाकले तरी जमिनीत राहीलेला भाग हा नविन रोग पसरण्यास मदत करतो.

३० ते ३५ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान आणि जमिनीतील जास्त प्रमाणातील पाणी, यामुळे रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार हा वेगाने होतो. ज्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते त्या जमिनीत रोगाची लागण व प्रसार हा जास्त प्रमाणात होतो.

नियंत्रण व उपाय –

 • ज्या जमिनीत पुर्वी रोगाची लागण झाल्याची नोंद आहे तेथे शक्यतो लागवड करु नये.
 • ज्या जमिनीत सुत्रकृमी आणि हुमणी यांचा त्रास असेल त्या जमिनीत या दोन्ही किडींचे नियंत्रण करावे. या किडींनी मुळांवर केलेल्या जखमांतुनच रोग रोपात प्रवेश मिळवीत असल्याने या किडींचे नियंत्रण कऱणे हा एक महत्वाचा विषय ठरतो.
 • शेतातील अवजारे आणि हत्यारे हि दुस-या शेतात वापरत असतांना ती निर्जंतुकीकरण केलेली असावीत.

रोग लागवड करीत असतांना रोपाच्या मुळांनी ईजा पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. रोगाच्या प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रोप लागवड केल्यानंतर १ एकर क्षेत्रात खालिल प्रमाणे जमिनीतुन बुरशीनाशकांचा वापर करावा.

 • ट्रायकोडर्मा विरिडे किंवा ट्रायकोडर्मा हरजॅनियम रोप लागवड केल्या नंतर लागलीच प्रथम पाण्यासोबत एकरी २०० ग्रॅम ते २.५ किलो (लिटर) द्यावे.
 • रोप लागणीनंतर १०-१२ दिवसांनी जमिनीत कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०० ग्रॅम व स्ट्रेप्टोमायसिन १०० पीपीएम द्यावे.
 • रोप लागणीनंतर २०-२५ दिवसांनी कॅपटन २५० ग्रॅम, व मॅन्कोझेब २५० ग्रॅम द्यावे.
 • रोगाची लागण झाल्याची नोंद असल्यास वरिल बुरशीनाशके ५ ते ७ दिवसांच्या अंतराने १-२ वेळेस द्यावीत.
 • रोगाची लागण झाल्याची नोंद असल्यास रोपास थोडे दिवस पाण्याचा ताण द्यावा, व परत पाणी देतांना बुरशीनाकांचा वरिल प्रमाणे वापर करावा.
 • रोगाच्या जैविक नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस चा वापर हा अत्यंत फायदेशिर ठरतो, मात्र हे वापरित असतांना ५ ते ७ दिवस आधी कोणतेही जीवाणू नाशक वापरु नये. यांस कॅपटन व मॅन्कोझेब चा अपवाद आहे, यासोबत बॅसिलस सबटिलस वापरता येईल.
 • रोपांस भरपुर निरोगी मुळ्या राहतील यासाठी ह्युमिक अँसिड, ६ बीए, सी-विड, अँमिनो अँसिड यांचा वापर करावा.

क्राऊन गॉल

capcicum, agriplaza, agriculture informationक्राऊन गॉल
 • अँग्रोबॅक्टेरियम मुळे होणारा हा रोग पिकाच्या मुळांच्या आणि खोडाच्या सांध्यावर गाठी तयार करतो.
 • या जीवाणू मध्ये एक विशिष्ठ असा जीन्स असतो कि ज्याच्या सहाय्याने हे जीवाणू पिकाचे मुळ जीन्स बदलवुन त्यात असे फेर बदल घडवुन आणतात की, ज्यामुळे गाठी तयार होतात.
 • गाठी तयार झाल्यामुळे पिकांस अन्नद्रव्यांचा पुरवठा बंद होतो व पिक मरुन जाते.
 • अशा गाठी ह्या मुळांवर,खोडावर तसेच काही वेळेस पानांवर देखिल तयार होवु शकतात.
 • जमिनीतुन फ्युमिगंटस चा वापर करणे यामुळे रोगाचा प्रसार थांबवला जावु शकतो.
 • तसेच जमिनीत गरम वाफेचा वापर करुन देखिल रोग नियंत्रणात आणता येतो. (६० डीग्री सेल्सियस ३० मिनीट)

अँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)

capcicum, agriplaza, agriculture informationअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)
capcicum, agriplaza, agriculture informationअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)
capcicum, agriplaza, agriculture informationअँन्थ्रॅक्नोज – (कोलेक्टोट्रिकम बुरशी)

कोलेक्टोट्रिकम हि बुरशी अनेक भाजीपाला पिके, कडधान्ये, फळपिके तसेच तृणधान्ये यावर रोग निर्माण करते.

मिरची पिकात पानांवर, फळांवर काळसर रंगाचे ठिपके पडतात, हे ठिपके जळालेल्या डागासारखे दिसुन येतात. या ठिपक्यांच्या भोवताली लालसर, किंवा पिवळसर रंगाचे डाग दिसुन येतात. पिकाच्या वाढीच्या काळात तसेच फळ काढणीनंतर देखिल रोगाची वाढ दिसुन येते. २७ डीग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमान आणि जास्त आद्रता हे रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात.

या बुरशीची प्रसार आणि पिकावर प्रथम प्रादुर्भाव करणारी कोनिडीया हि अवस्था, पिकाच्या पृष्ठभागावर गर्दी करुन जमा होते, त्यानंतर जर्म ट्युब तयार करुन पिकाच्या आत शिरते, व नंतर स्वतः ची वाढ करुन घेते.

नियंत्रण व उपाय –

 • रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.
अनु.क्र. बुरशीनाशकातील तात्रिक घटक क्रिया एफआरएसी कोड प्रतिकारक शक्ती
१. अझोक्सिस्ट्रोबीन आंतरप्रवाही ११ जास्त
२. कॅपटन स्पर्शजन्य एम ४ कमी
३. कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य एम १ कमी
४. कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही एम १ कमी
५. झिनेब स्पर्शजन्य एम ३ कमी
६. झायरम स्पर्शजन्य एम ३ कमी
७. क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य एम ५ कमी
८. डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
९. थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही जास्त
१०. बेनोमिल आंतरप्रवाही जास्त
११. मॅन्कोझेब स्पर्शजन्य एम ३ कमी

सर्कोस्पोरा लिफ स्पॉट

capcicum, agriplaza, agriculture informationक्राऊन गॉल
 • सर्कोस्पोरा लिफ स्पॉट हा सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होणारा रोग आहे. या रोगात पानांवर लंबाकार, गोलाकार असे करड्या रंगाचे ठिपके पडतात, या ठिपक्यांच्या कडा ह्या गर्द रंगाच्या असतात. काही दिवसांनंतर मधिल करडा भाग कोरडा होवुन तो गळुन पडतो व त्यामुळे तेथे छिद्र पडलेले दिसुन येते.
 • पान पिवळसर होते.
 • हा रोग पिकाच्या पानांवर, खोडावर तसेच देठावर देखिल दिसुन येतो.
 • २० ते २५ डिग्री सेल्सियस तापमानत रोगाचा वाढ हि झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी आद्रता पोषक ठरते.
 • रोगाची वाढ हि ५ डीग्री सेल्सियस पेक्षा कमी व ३५ डिग्री पेक्षा जास्त असल्यास रोगाची वाढ कमी होते.
 • रोगाचा प्रसार हो बाष्प मिश्रित वारा वाहणे, अवजारे, स्पर्श, वारा यामुळे वेगाने होतो.

नियंत्रण व उपाययोजना –

 • रोपांची लागवड जास्त दाट करु नये.
 • रोपांच्या पानांवर जास्त वेळ पाणी साचुन राहत असेल तर रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करावा.
 • रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.
अनु.क्र. बुरशीनाशकातील तात्रिक घटक क्रिया एफआरएसी कोड प्रतिकारक शक्ती
१. प्रोपीनेब स्पर्शजन्य एम ३ कमी
२. कॅपटन स्पर्शजन्य एम ४ कमी
३. कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य एम १ कमी
४. मायक्लोब्युटॅनील आंतरप्रवाही मध्यम
५. झिनेब स्पर्शजन्य एम ३ कमी
६. झायरम स्पर्शजन्य एम ३ कमी
७. क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य एम ५ कमी
८. डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
९. थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही जास्त
१०. बेनोमिल आंतरप्रवाही जास्त
११. मॅन्कोझेब स्पर्शजन्य एम ३ कमी

चारकोल रॉट (Macrophomina phaseolina)

 • जवळपास ५०० पेक्षा अधिक पिकांवर हा रोग आढळुन येतो. या रोगाच्या वाढीसाठी ताण पडलेली रोपे, जास्त तापमान आणि कोरडे हवामान पोषक ठरते. पिकाच्या मुळाना आणि मुळांजवळील खोडांस ह्या रोगामुळे ईजा पोहचते. सोयाब ीन, भुईमुग, मका, जीरे, संत्री,कोबी, ज्वारी, चवळी,बीट, रताळे, सुर्यफुल या पिकांवर देखिल हा रोग दिसुन येतो.
 • रोपाच्या मुळांजवळील भागात, खोडात लालसर तपकिरी रंगाची वाढ दिसुन येते. खोड आतुन चिरुन बघितली असता असा लालसर पट्टा किंवा रेष स्पष्ट पणे दिसुन येते.
 • काही दिवसांनी हा भाग काळसर, तपकिरी रंगाचा होतो.
 • काही वेळेस रोपाचा कॉलर रिजन (जेथे खोड मुळांस एकत्र होते तो भाग) चा भाग हा कुजतो.

नियंत्रण व उपाययोजना –

 • रोगाच्या नियंत्रणासाठी रोपांची कमी अंतरावर लागवड करु नये.
 • पिकांस स्फुरद व पालाश हि अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात द्यावी, जेणे करुन निरोगी वाढ मिळेल.
 • रोपांस नियमित पाणी द्यावे.
 • रोगाच्या वाढीस पोषक ठरेल अशा पिकांची लागवड करु नये.

वेट रॉट

capcicum, agriplaza, agriculture informationवेट रॉट
capcicum, agriplaza, agriculture informationवेट रॉट
 • मिरची, ढोबळी मिरची आणि टोमॅटो पिकावर हा रोग दिसुन येतो.
 • या रोगामध्ये पानांवर, खोडांवर, फळांवर कुज दिसुन येते. ठिपक्यांचा कडा या पिवळसर, तपकिरी, लाल रंगाच्या असतात. पानांवर ब्लाईट सारखे डाग दिसुन येतात.
 • रोगाचे महत्वाचे लक्षण आहे ते बुरशी वाढते तेथे पांढ-या, चंदेरी रंगाचे सुक्ष्म केस वाढलेले दिसुन येतात.
 • खोडावरिल भाग हा ओलसर आणि हिरवट होते, खोडावरिल साल सहजासहजी निघुन जाते.

मुळ कुज, क्राऊन रॉट

फायटोप्थोरा कॅपसिसी या उमायसिटस हा रोग होतो. या रोगात रोप वेगात सुकते व मरुन जाते. रोगाच्या निदानापुर्वी काळजी पुर्वक परिक्षण करणे गरजेचे आहे. रोगाची लागण झाल्यानंतर रोपाचे सोटमुळ व लहान उप मुळ यांच्या वर पाणी शोषुन घेतल्या सारखे पट्टे पडतात. मुळाच्या आतिल भाग हा गर्द तपकिरी रंगाचा बनतो. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाची लागण होवु शकते.

रोपाच्या जमिनीलगतच्या खोडावर देखिल लक्षणे दिसुन येतात. खोड सुरवातीला गर्द हिरवे बनते, पाणी शोषुन घेतल्या सारखे नरम बनते व नंतर तपकिरी पडुन कोरडे होते.

या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, मेटालॅक्झिल,कॉपर युक्त बुरशीनाशके यापैकि एकाचा वापर करता येतो. हा रोग उमायसिटस मुळे होत असल्या कारणाने बुरशीनाशके निवडतांना ती ऊमायसिटस नाशक अशीच निवडावीत.

रोगाची लागण न होवु देणे हाच या रोगाच्या नियंत्रणाचा भक्कम उपाय आहे, त्यासाठी जमिनीत ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करावा. रोग आल्यानंतर रोगाच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस हा जीवाणू देखिल अत्यंत प्रभावी ठरतो.

जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते.

व्हर्टिसिलियम विल्ट

capcicum, agriplaza, agriculture information

व्हर्टिसिलियम मुळे होणारा हो रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत होवु शकतो. या रोगात मुळे बाहेरुन काळसर दिसत नाहीत मात्र रसवाहीन्या या गर्द तपकिरी ते काळसर रंगाच्या बनतात. जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते. पिकाच्या जमिनीवरिल भागातील लक्षणे हि रुट रॉट किंवा क्राऊन रॉट प्रमाणेच दिसुन येतात. रोपाची पाने पिवळी पडुन गळतात, पानांच्या कडा वरिल बाजुन आत वाकतात. पिकाची वाढ खुंटते.

पावडरी मिल्ड्यु (भुरी)

capcicum, agriplaza, agriculture information

इतर भुरीच्या बुरशीमध्ये आणि या प्रजाती मध्ये एक मुलभुत फरक असा आहे कि, ही जात पानांच्या वर न वाढता पानांच्या आत वाढत जाते. पानांच्या वरिल भागावर पांढ-या रंगाची पावडर दिसुन येते. रोगाची लागण पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होत असली तरी प्रामुख्याने फळ तयार होत असतांना व उबदार वातावरणात जास्त प्रमाणात लागण होते. या रोगाची लागण १८ ते ३३ डि. से. तापमानात आणि कमी किंवा जास्त आद्रता असलेल्या वातावरणात देखिल होते.

रोगाच्या वाढीस अनुकुल वातावरण असतांना दर ७ ते १० दिवसांनी दुय्यम प्रादुर्भाव वेगाने होतो.

अनु.क्र. बुरशीनाशकातील तात्रिक घटक क्रिया एफआरएसी कोड प्रतिकारक शक्ती
१. अझाक्झिस्ट्रॉबीन आंतरप्रवाही ११ जास्त
२. बेनोमिल आंतरप्रवाही जास्त
३. डिनोकॅप स्पर्शजन्य २९ -
४. फेनारिमोल   मध्यम
५. फ्लुसिलॅझोल आंतरप्रवाही मध्यम
६. मायक्लोब्युटॅनिल आंतरप्रवाही मध्यम
७. सल्फर स्पर्शजन्य एम २ कमी
८. थायोफिनेट मिथाईल आंतरप्रवाही जास्त
९. ट्रायडिमेफॉन आंतरप्रवाही मध्यम
१०. हेक्झाकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
११. पेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम

कर्ली टॉप व्हायरस

तुडतुड्यामुळे पसरणारा हा एक विषाणुजन्य (व्हायरस) रोग आहे. या रोगात पिकाची पाने जवळजवळ येतात, पानांच्या कडा वरिल बाजुस वाकतात. तसेच फळे पक्व होवुन गळुन न पडता आकाशाकडे वरील दिशेला अशी सरळ दिशेने रोपावरच राहतात. कर्टोव्हायरस या जेनेरा मधिल हा व्हायरस व्दिदल पिकांवर दिसुन येतो.

रोगाच्या नियंत्रणासाठी तुडतुडे किडीचे नियंत्रण करावे.

ककुंबर मोझॅक व्हायरस

मावा किडी मुळे या व्हायरस चा प्रसार होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. या रोगात पिकाची पाने पिवळसर पडतात, मुख्य शीर नागमोडी आकाराची येते. पानांचा आकार लहान राहतो. पाने काही वेळेस वरिल बाजुस वाकतात. फळावर काही वेळेस गोलाकार रिंग किंवा ठिपके दिसुन येतात. मावा किड काही मिनिटांपासुन तर काही तासांपर्यंत अशा थोड्या वेळासाठीच व्हायरस पसरणवण्याची क्षमता ठेवते. जास्त प्रमाणातील मावा किडीची संख्या फार थोड्या वेळात अनेक रोपांवर प्रादुर्भाव करु शकते. मावा किड नियंत्रणात आणुन देखिल रोगाचा प्रसार थांबवणे शक्य होत नाही, कारण हि किटकनाशके मावा किडीस रोग संक्रमित कऱण्यापुर्वी मारतीलच याची शाश्वती नसते.

डँपिंग ऑफ

capcicum, agriplaza, agriculture informationडँपिंग ऑफ
 • डँपिंग ऑफ हा रोग प्रामुख्याने रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळात दिसुन येतो. हा रोग पिथियम स्पे. या बुरशीमुळे होतो.
 • रोग ग्रस्त रोप उगवत नाही किंवा उगवुन आल्यानंतर कोसळुन मरुन जाते. डॅंपिंग ऑफ हे घट्ट व कडक झालेल्या जमिनीत ज्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही अशा जमिनीत जास्त प्रमाणात दिसुन येतो. तसेच रोप लागवडिच्या सुरवातीच्या काळात जास्त प्रमाणात पाउस झाल्यास हि समस्या जास्त प्रमाणात जाणवते. जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते.
 • थंड व ओल्या जमिनीतील हि एक प्रमुख समस्या आहे.
 • रोगाच्या नियंत्रणासाठी शेतातील जमिन हवेशीर (वाफशा स्थितीत) राहील याची दक्षता घ्यावी. रोप लागवडीनंतर भरपुर पाणी देवु नये. पिकांस लागवडीच्या आधी मेटालॅक्झिल किंवा ट्रायकोडर्मा ची प्रक्रिया करुन लागवड करावी.
 • तसेच रोप लागवडीनंतर कॅपटन, एम ४५ चा देखिल वापर करता येईल.

agriculture online shopping banner
mulching paper banner, shopp onlie

What is a Pest?

An organism is considered a pest when it starts to damage crops and affect yields. They can be insects or other arthropods such as snails, slugs or mites. Pests are also disease causing agents such as bacteria, viruses, fungi, and nematodes.

What is a Disease?

A disease is described as an organism that changes the normal state of the plant by disrupting the functions of the plant. Often a disease is caused by disease causing agents (pathogens), environmental factors, inherent defects of the plant, or a combination of these factors.

Problems with Insect Pests

These diseases and insects can damage crops by reducing their yielding and having a negative impact on their quality. Conventional farmers use synthetic pesticides to combat pests. Besides being hazardous to the farm workers’ health and leaving toxic residues on crops, the uses of these pesticides have other negative consequences. Pests can develop resistance to pesticides, requiring a stronger pesticide.

Organic farmers’ attempts to prevent and control pests without using synthetic pesticides. This is done by maintaining healthy soil and by designing a diverse habitat for beneficial insects and natural pest opponent. As a last resort, organic farmers may use organize pesticide or disk in a crop to avoid a sever pest infestation.

© Agriplaza Network

Agriculture, Agriculture information, Agriculture, Farming, Cotton, Weed Management, Fertilizer Management, Grapes, Ginger Plantation, Agro, Maharashtra, Plant Protection, Soil Management, Soil Testing, climbers, pesticide, fungicide, organic farming, Agribusiness, Agricultural Business, keli sheti vishai mahiti, sheti sathi purak udyag dhande, agriculture business, agribusinesss, sheti margadarshan, kobi, phul kobi, vange lagwad, sheti shanshodhan, kakadi lagwad, karle lagwad, vel gargiya pike, keli til jibralik acid, chileted palash and potash, gahu, soyabean, uss, sugarcane, kapus, saphed musali, mirchi, chilli, bhendi, batata, potato cultivation, papai, krushi salla, pik sanrakshan, crop protection, duyyam anadrave, shukshma anadrave, mukhya aanadrave, kanda sehti, chal, kandyahe rate, onion cultivation, garlic, lasun sheti, agriculture success stories, success stories, shetitil yashasvi prayog, micro nutrients, boron, calcium nitrate, chilated zink, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, Cabbage, Poultry (broiler) manure, Dairy Cow Manure, Beans, Carrots, Cauliflower, Anthurium, Carnation, Rose , Mango , Papaya, Orange, navel, Tomato, Banana , Lime, Eggplant, Ginger, JWARI, BAJARI LAGWAD, anjir lagwad, Biogas, tur lagwad, Cotton Cultivation, cotton plantation, cotton weed management, cotton production, BT cotton, cotton fertilizer management, pesticide management, kapasawaril phawarni, kapus utpadan, kapus pik, cottonseed crushers, cotton fabric, mava, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, sweet corn Cultivation, maize Cultivation, plantation, protection, fertilizer, pesticide, Corn Flour, corn stunt, fertilizer management, pesticide management, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, wheat Cultivation, lok1, wheat plantation, wheat fertilizer dose, soil management, pyrenophora avenae, fertilizer management, pesticide management, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content,soydean Cultivation, Rhizoctonia, plantation, fertilizer dose, soybean seeds, soybean oil, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, Peanut Cultivation, groundnut plantation, groundnut farming, fertilizer dose, soil management, groundnut seed, diseases of peanuts, Botrytis, grams cultivation, grams plantation, farming, agriculture information, plural grams, green gram, grams cultivation, grams plantation, farming, agriculture information, plural grams, green gram, grape cultivation, grape farming, grape wine, botryoshaeria, grape growing, grape equipments, grape machinery, nashik grapes, Grape Root Borer, fertilizer management, pesticide management, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, Pomo: pomegranate plantation, pomegranate tree, pomegranate farming, weed management, fertilizer management, soil management, fertilizer management, pesticide management, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, papai: fertilizer management, pesticide management, papai sheti, papai cultivation, papai lagwad margadarhan, products from papaya, papai waril bhuri rog, papaitil boron kamtarta, phalmashi, papai lagwad padhati, papai rope, plants of papaya, papai nursery, Organic Fertilizers, Organic Farming, organic crops, Nutrient Content, Krushi Salla: Agriculture, Agriculture information, Agriculture, Farming, Cotton, Weed Management, Fertilizer Management, Grapes, Ginger Plantation, Agro, Maharashtra, Plant Protection, Soil Management, Soil Testing, climbers, pesticide, fungicide, organic farming, Agribusiness, Agricultural Business, keli sheti vishai mahiti, sheti sathi purak udyag dhande, agriculture business, agribusinesss, sheti margadarshan,