logo

फळ पोखरणारी किड (Anar Caterpillar) (Virachola (Deudorix )isocrates)

सक्रिय काळ व नुकसानीचा प्रकार

अळी फळांच्या आत कळी अवस्थेत किंवा फळ लहान असतांना शिरते. आतिल गर खाते. फळ आतुन सडुन जाते. अळीची विष्ठा अळी ने फळात जाण्यासाठी केलेल्या छिद्रातुन बाहेर येते.

अंडी देण्याचा काळ

एकट्याने (एका ठिकाणी एक) या प्रमाणे चमकदार पांढ-या रंगाची अंडी कळ्यांवर, लहान फळांवर दिली जातात. अंडी अवस्था 7 दिवसांची असते. हि कीड पेरु, चिंच, संत्री, आवळा, तसेच चिकु पिकांत देखिल दिसुन येते.

सुप्तावस्था

सुप्तावस्थेत जाण्या अगोदर अळी फळाच्या बाहेर येते, त्यानंतर फळांस झाडाच्या खोडास बांधते, पुन्हा फळात शिरुन त्यात कोषावस्था पुर्ण करते. किंवा देठावर देखिल सुप्तावस्था पुर्ण करते.

नियंत्रणाचे उपाय

फळांस पिशवी बांधणे (जर बाग छोटी असेल तरच शक्य आहे) फुलोरा आल्यानंतर अळी नाशक फवारणी करावी. डाळींब बागेत सिंथेटिक पायरेथ्राईड चे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी पानगळ किंवा फुलगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणातच फवारणी करावी. शक्यतो सिंथेटिक पायरेथ्राईड वापरु नये. इमामेक्टिन, (प्रोक्लेम), अप्लॉड, इन्डाक्झाकार्ब ची फवारणी त्यातल्या त्यात काही प्रमाणत सुरक्षित आहे.