logo

कॉपर (मोरचुद)| Copper

कॉपर चे पिकातील कार्य आणि कमतरतेची लक्षणे

प्रकाश संश्लेषण क्रियेत आणि उर्जा निर्मितीमधे महत्वाची भुमिका पार पाडते.

अँमिनो अँमिड चे रुपांतर प्रथिनांत करणा-या अनेक एन्झाईम्स चा एक घटक आहे.

कर्बोदके आणि प्रथिनांच्या पचनात महत्वाची भुमिका पार पाडते. कॉपर पिकाच्या पेशीतील लिग्निन निर्मिती मधे महत्वाची भुमिका पार पाडते, ज्यामुळे पेशीस रचनात्मक शक्ती मिळते.

फळांची चव, साठवणुक क्षमता तसेच साखरेचे प्रमाण यावर परिणाम करते.

कॉपर पिकाच्या रोग प्रतिकारक शक्ती मधे देखिल कार्य करते. पुंकेसरांच्या फर्टिलीटी मधे देखिल कॉपर महत्वाची भुमिका पार पाडते.

जमिनीत कॉपर हे वहनशिल असे अन्नद्रव्य नसल्याने कमी प्रमाणात मुळांची वाढ झालेली असल्यास कॉपर ची कमतरता जाणवते.

जास्त सामु असलेल्या जमिनीत कॉपर ची कमतरता जाणवते. सेंद्रिय पदार्थ जास्त असलेल्या जमिनीत कॉपर चे चिलेशन होवुन त्याची पिकास होणारी उपलब्धता वाढते.

जास्त प्रमाणात झिंक असल्यास कॉपर ची कमतरता जाणवते. जास्त प्रमाणात नत्राचे शोषण झाल्यास कमी प्रमाणातील कॉपर चे पिकाच्या टोकाकडिल भागात कमी प्रमाणात वहन होते.

कॉपर च्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात, व्दिदल वर्गिय पिकात गरजे पेक्षा जास्त प्रमाणात फांद्या दिसुन येतात. पिकाची वाढ खुंटते, पुंकेसराच्या फर्टिलिटि वर परिणाम झाल्याने परागीभवनात देखिल परिणाम जाणवतात.

पिकाची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे रोगांचे प्रमाण वाढीस लागते.

कॉपर जास्त प्रमाणात झाल्यास पिकाची पाने गर्द निळसर हिरवी होतात, त्यानंतर पानांच्या रंग पांढरा होतो. पिकाव्दारे कमी प्रमाणात फेरस चे शोषण झाल्यास कॉपर विषबाधे पर्यंतची पातळी गाठु शकते. माती परिक्षण केल्या शिवाय जास्त प्रमाणातील कॉपर चा वापर हा अनेक वर्षांपर्यंत घातक ठरतो.

जमिनीत जास्त प्रमाणात कॉपर असल्यास नत्र, स्फुरद, मॉलेब्डेनम, झिंक च्या वापरातुन जास्त कॉपर चे दुष्परिणाम दुर करता येतात.