logo

डाऊनी मिल्ड्यु

कांदा पिकावरिल डाऊनी मिल्ड्यु हा पेरोनोस्पोरा डिस्टक्टर (Peronospora destructor)

या बुरशीमुळे होतो. ६ ते २५ डि.से. तापमान आणि १ ते ७ तास पानांवर ओलसर पणी राहील्यास रोगाची लागण होते. या रोगात सुरवातीला पान हलक्या हिरव्या रंगाचे, पिवळसर बनते, कालांतराने पानांवर खोलगट असे तपकिरी, लालसर रंगाचे ठिपके दिसुन येतात ज्यावर डाऊनीच्या बुरशीची वाढ दिसुन येते. ओलसर हवेतुन रोगाचा प्रसार वेगात होतो, जास्त तापमान रोगास पोषक ठरत नाही. वाढलेले तापमान रोगाच्या नियंत्रणात नैसर्गिक मदत म्हणुन कार्य करते.

रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर, मॅन्कोझेब, मॅनेब, फेनामिडॉन, क्लोरोथॅलोनिल यांचा वापर करता येईल.