logo

header-ad
header-ad

दहिया (ग्रे मिल्ड्यु किंवा एरोलेट मिल्ड्यु)

हा रोग राम्युलॅरिया एरिओला ह्या बुरशीमळे होतो. महाराष्ट्र, तमिलनाडु, आंध्रप्रदेश ह्या राज्यात हा रोगामुळे कापुस पिकाचे २६ ते ६६ टक्के ईतके नुकसान होते. महाराष्ट्रातील विदर्भात ह्या रोगामुळे कापुस पिकाचे २१ टक्क्यांपर्यंत नुकसान होते अशी नोंद आहे.

हा रोग सर्व प्रथम अमेरिकेत १८९० साली आढळुन आला होता. रोगाच्या सुरवातीच्या लक्षणांत पानांवर त्रिकोणी, आयाताकृती, असे हलक्या पांढ-या रगांचे ठिपके पडतात. हे ठिपके आकाराने वाढत जावुन अनेक वेळेस पुर्ण पान व्यापतात. रोगाच्या बुरशीची वाढ झाल्यानंतर जेथे डाग आहेत तेथे पांढ-या रंगाचे कोनिडिया प्रथम पानांच्या खालिल बाजुस आणि नंतर पानांच्या वरिल बाजुस दिसुन येतात. बुरशीचे कोनिडिया हे स्पोअर्स पांढ-या रंगाचे असल्या कारणाने ते जेव्हा पानांचा पृष्ठभाग व्यापुन असतात त्यावेळेस पानांवर दही सांडल्या सारखे दिसुन येते म्हणुन ह्या रोगास दहिया असे म्हणतात.

दहिया/एरोलेट मिल्ड्यु

जुन ते सप्टेंबर महिन्यांत जास्त पाऊस, किमान तापमान १९.७ ते २३.७ डि.से. आणि कमाल तापमान २९.४ ते ३०.९ डि.से. आणि रात्रीची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८५ टक्के, सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५.५ ते ६२ टक्के ईतकी असल्यास पिकावर रोगाचा संसर्ग होण्यास अत्यंत पोषक वातावरण असते. जास्त आर्द्रता (९० ते ९१ टक्के) आणि थंड तापमान (२३ ते २७ डि.से.) तापमान रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते.

नियंत्रण

रोग प्रतिकारक वाणांचा लागवडीसाठी वापर करावा.

लागवडीचे अंतर हे वायुविजनासाठी पोषक ठरेल, तसेच फवारणीस अडचण येणार नाही अशा प्रकारे ठेवावे.

हा रोग प्रामुख्याने पावसाळा संपल्यानंतर आढळुन येतो. त्या वेळेस कापसाची वाढ भरपुर झालेली असल्याने शिफारस केलेल्या रोपांच्या संख्येपेक्षा जास्त रोपांची संख्या असल्यास रोपांची दाटी होवुन बुरशीनाशकांची फवारणी घेणे अशक्य होते.

पिकास शिफारस केलेली नत्राची मात्रा द्यावी. अमोनिकल आणि युरिया स्वरुपातील नत्राचा अतिरिक्त वापर हा पिकासाठी घातक ठरुन पिक रोगास लवकर बळी पडते.

पिकावर प्रतिबंधकात्मक म्हणुन पावसाच्या अंदाजानुसार, क्लोरोथॅलोनिल आणि झायरम ह्यांची एकत्रित फवारणी घ्यावी. रोगाची लागण झाल्यानंतर कॅपटन, मॅन्कोझेब, किटाझिन ह्यांच्या पैकी एकाची फवारणी घ्यावी.