logo

ककुंबर मोझॅक व्हायरस – (CMV)

मावा किडी मुळे या व्हायरस चा प्रसार होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. या रोगात पिकाची पाने पिवळसर पडतात, मुख्य शीर नागमोडी आकाराची येते. पानांचा आकार लहान राहतो. पाने काही वेळेस वरिल बाजुस वाकतात. फळावर काही वेळेस गोलाकार रिंग किंवा ठिपके दिसुन येतात. मावा किड काही मिनिटांपासुन तर काही तासांपर्यंत अशा थोड्या वेळासाठीच व्हायरस पसरणवण्याची क्षमता ठेवते. जास्त प्रमाणातील मावा किडीची संख्या फार थोड्या वेळात अनेक रोपांवर प्रादुर्भाव करु शकते. मावा किड नियंत्रणात आणुन देखिल रोगाचा प्रसार थांबवणे शक्य होत नाही, कारण हि किटकनाशके मावा किडीस रोग संक्रमित कऱण्यापुर्वी मारतीलच याची शाश्वती नसते

मावा किडी मुळे या व्हायरस चा प्रसार होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. या रोगात पिकाची पाने पिवळसर पडतात, मुख्य शीर नागमोडी आकाराची येते. पानांचा आकार लहान राहतो.

Cucumber Mosiac Virus
Cucumber Mosiac Virus

Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी रोपांची कमी अंतरावर लागवड करु नये.