logo

Alternaria Leaf Spot | अल्टरनॅरिया लिफ स्पॉट

Alternaria melongenae, Alternaria solani

या रोगाचा प्रसार हा वा-या व्दारे पसरणा-या कोनिडिया या स्पोअर्स मुळे होतो. या रोगाच्या अल्टरनॅरिया मेलोंगॅनी आणि सोलॅनी ह्या दोन्ही जातींमुळे वांगी पिकावर रोगाची लागण होते. रोगाची लागण होण्यासाठी २६ ते २९ डिग्री तापमान पोषक ठरते, सततचा ओलावा, जास्त आर्द्रता रोगासाठी पोषक ठरते. रोगाचे बीजाणू पोषक वातावरणात अगदी अर्ध्या तासात देखिल रुजतात, आणि त्यानंतर ३ ते १२ तासांत पानांच्या आत शिरतात. रोगाच्या लक्षणात, पानांवर लालसर, तपकिरी रंगाचे ठिपके पडतात, ठिपक्यांच्या आतील भागास तडे गेलेले दिसुन येतात.

Alternaria Leaf Spot

रोगाची सुप्तावस्था ही रोगग्रस्त पिकाचे अवशेष, तसेच मातीत असते. रोगाचे स्पोअर्स (बीजाणू) हे वा-या व्दारे तसेच पाण्याच्या व्दारे उडुन, निरोगी पानांस प्रादुर्भाव करतात. रोगाची लागण झालेली असतांनाच त्या डागांतुन नवीन स्पोअर्स वाढतात व सेकंडरी प्रादुर्भाव तेथुन मोठ्या प्रमाणात वाढतो. रोगाच्या वाढीसाठी जास्त आर्द्रता युक्त वातावरण, तसेच ओली पाने मदत करतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
सायमॉक्झानील + फेमॉक्झाडोन आंतरप्रवाही कमी ते मध्यम + जास्त
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त