logo

पनामा विल्ट

केळी पिकातील पनामा विल्ट

केळी पिकावर पनामा विल्ट चा प्रार्दुभाव हा फ्जुजॅरियम ऑक्झिस्पोरियम ह्या बुरशीमुळे होतो. ह्या रोगाची लागण झाल्यानंतर रोग नियंत्रणात आणणे कठिण असते, मात्र योग्य ती काळजी आधीच घेतल्यास रोगापासुन पिकाचा बचाव करणे शक्य होते. फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरियम क्युबेन्सीस हि बुरशी केळी पिकाच्या मुळांतुन पिकांत शिरते. एखाद्या शेतात ह्या बुरशीचा प्रार्दुभाव झाल्यास तो अनेक वर्षांपर्यंत त्या शेतात कायम राहतो.

केळी पिकावरिल पनामा विल्ट रोगास कारणीभुत ठरणारी फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरियम व्ह. क्युबेन्स ह्या बुरशीबाबत आपण पहिल्या भागात माहीती घेतली. ह्या बुरशीचे स्पोअर्स, केळीच्या मुळांव्दारा स्रवल्या जाणा-या रसामुळे सचेत होवुन अंकुरण पावल्यानंतर कोनिडिया (बुरशीच्या शरीर रचनेतील असा भाग जो स्पोअर्स ची निर्मिती करतो) ची निर्मिती हि ६ ते ८ तासांत पुर्ण होते, आणि त्यावर क्लॅमिडोस्पोअर्स ची निर्मिती २ ते ३ दिवसांत होते. हे क्लॅमिडोस्पोअर्स त्यानंतर पुन्हा नविन रोपास प्रार्दुभाव करण्यात सक्षम होतात.

ह्या रोगाची वाहतुक हि केळीच्या रोपाच्या विविध भागांव्दारा होत असते. त्यांची माहीती खालिल प्रमाणे

  • ◉ खोडातुन (जो जमिनीच्या वर असतो)
  • ◉ कंदातुन (जे जमिनीच्या खाली असते)
  • ◉ आरु (किंवा लहान कंद)
  • ◉ मुळांच्या माध्यामातुन
  • ◉ शेंड्यातुन
  • ◉ फांद्यातुन

ह्या रोगाची वाहतुक केळीच्या खालिल भागांव्दारे होत असल्याची नोंद नाही

  • ◉ पाने
  • ◉ फळे, केळ फुल (कमळ फुल जे घडाच्या तळाशी जमिनीकडे असते.)
  • ◉ केळीची रोपे, टिश्यु कल्चर रोपे

केळी वरिल पनामा विल्ट चे नियंत्रणाचे उपाय

  • ◉ केळी वरिल विल्ट ची बुरशी ३ प्रकारचे स्पोअर्स तयार करते. आणि त्यातील सर्वात घातक स्पोअर्स हे बुरशीच्या रुजण्याच्या केवळ २-३ दिवसातंच तयार केले जाताते. अशा प्रकारे स्पोअर्स तयार करण्याची क्षमता म्हणजे रोग नियंत्रणास अत्यंत कठिण आहे हेच दर्शवतो.
  • ◉ रोग ग्रस्त रोपे हि क्लॅमिडोस्पोअर्स ची निर्मिती करतात, आणि हे स्पोअर्स अनेक वर्ष सुप्तावस्थेत राहु शकतात.
  • ◉ रोगाचा वाढण्याचा वेग आणि सुप्तावस्थेत राहण्याची क्षमता ही फार जास्त आहे.
  • ◉ रोग केळीच्या मुळांतुन शिरुन, खोडात प्रवास करतो. खोडातील भाग सडवुन, त्यावर उपजिविका करतो. हा सर्व प्रकार पिकाच्या शरिराच्या आत घडत असल्या ने रोग नियंत्रणात जास्त कठिण ठरतो.
  • ◉ रोगाचा प्रसार हा केळी चे बेणे, मुनवे, आरु, खोड ह्या व्दारे तर होतोच पम त्या सोबत, शेतात वापरली जाणारी विविध वाहने, माणसे, अवजारे ह्यांच्या माध्यामातुन देखिल होतो. त्यामुळे ज्या ठिकाणी रोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे तेथुन कशाची वाहतुक होते ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

रोग नियंत्रणासाठी महत्वाचे उपाय

  • ◉ केळी विल्ट येवुन नये, हा ह्या रोगासाठी सर्वोत्तम उपाय आहे. रोग आल्यानंतर रोग नियंत्रणात आणणे हे अत्यंत खर्चिक, आणि प्रभावी ठरेल ह्याची काहीही खात्री नाही. तेव्हा रोग येवु नये ह्याची पुर्ण जबाबदारीने आणि गांभिर्याने काळजी घेणे गरजेचे आहे.
  • ◉रोगग्रस्त क्षेत्रातुन, निरोगी क्षेत्रात, रोगास वाहुन नेवु शकेल अशी कोणत्याही वस्तुची, माणसांची, प्लांटेशन मटेरियल ची वाहतुक होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
  • ◉ बेण्यांपासुन लागवड करण्याच्या पध्दतीचा अवलंब करणे टाळावे, जेथे रोपांपासुन लागवड करणे शक्य नसेल तेथे निरोगी क्षेत्रातुनच बेण्याची निवड करावी.
  • ◉ शेतात काम करणा-या सर्व मजुरांस रोगाच्या लक्षणांबाबत पुर्ण माहीती करुन द्यावी. रोगग्रस्त रोप आढळुन आल्यास ते त्वरित जाळुन नष्ट करावे. शेताच्या बांधावर टाकुन, नंतर सगळे एकत्र जाळु असे करु नये. रोगग्रस्त रोपाची मरण्याची प्रक्रिया वेगात व्हाव्ही म्हणुन त्यास जाळणे, किंवा ग्लायफोसेट चे इंजेक्शन देवुन ते रोप लवकर मारावे, जेणे करुन त्यात जास्त प्रमाणात स्पोअर्स तयार होणार नाहीत.
  • ◉ रासायनिक खतांच्या वापराचा देखिल रोगावर परिणाम होत असतो. नायट्रेट नाट्रोजन चा वापर केल्यास रोगाच्या नियंत्रणात मदत मिळते असे आढळुन आले आहे (Huber y Watson, 1974 ,Jones et al., 1989, Wolf & Jones, 1981)
  • ◉ अमोनिकल स्वरुपातील नायट्रोजन चा वापर केल्यास रोगाच्या वाढीस मदत मिळते असे आढळुन आले आहे. (Dominguez et al., 1996,olf & Jones, 1981)
  • ◉ मातीचा सामु हा जर जास्त असेल तर (७ पेक्षा जास्त) तर रोगाच्या वाढीस अनुकुल ठरत नाही. जर पी एच ७ असेल तरी देखिल रोगाच्या वाढीस फारसा फायदा होत नाही. मात्र जर पीएच हा अँसिडिक असेल (६.५ पेक्षा कमी) तर मात्र रोगाच्या वाढीसाठी फायदा होतो. (Wolf & Jones, 1981,Dominguez et al., 2001,Dushkova & Prokinova,1989 )
  • ◉ कॅल्शियम चा वापर केल्यास क्लॅमिडोस्पोअर्स चे रुजणे कमी करणे शक्य होते. (Höper et al., 1995, Peng e al., 1999)
  • ◉ ज्या जमिनीत पोटॅश, स्फुरद, मॅग्नेशियम चे प्रमाण जास्त असते त्या जमिनीत रोगाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण राहत नाही.
  • ◉ मातीत फेरस ची कमतरता असल्यास रोगाच्या क्लॅमिडोस्पोअर्स ना रुजण्यात मदत मिळते.
  • ◉ मातीत मँगनीज आणि झिंक ची कमतरता असल्यास रोगाच्या नियंत्रणात मदत मिळते.
  • ◉ रासायनिक नियंत्रण करत असतांना, प्रोडक्ट वरिल लेबल क्लेम (किंवा तसा तो भारतात नसेल तर, शिफारस केलेल्या बुरशीनाशकांतील घटक गुगल करुन तो परदेशात तरी शिफारस केलेला आहे किंवा नाही ह्याची खात्री करुनच वापरावे.) तपासुनच वापर करावा. रोगाची भिती दाखवुन, आणि शेतकरी देखिल घाबरुन जावुन काय वाटेल ते, (लक्षात घ्या आलेला विल्ट हा कंट्रोल होत नाही, तो पसरु नये म्हणुन रासायनिक उपाययोजना देखिल फारशी फायदेशीर ठरत नाही.) जर वापरणार असाल, तर मात्र येत्या काही वर्षात केळीची लागवड विल्ट मुळे न नष्ट होता, शेतकरी मनाला वाटेल तसे वागल्याने १०० टक्के नष्ट होईल. कोणी जर असा दावा करत असेल की अमुक वापरल्याने हा रोग येणारच नाही तर त्या पासुन सावध रहा. शास्रज्ञ, वैज्ञानिक, (भारतिय आणि परदेशी देखिल) ह्यांच्या अभ्यासानुसारच बुरशीनाशक निवडा. येथे शेवटी विविध उपयुक्त लिंक दिल्या आहेत त्यास भेट देवुन नंतरच खात्री करुन उपाययोजना निवडावी.
  • ◉ शेतक-यांनी निवडलेले किंवा त्यांच्या वर कंपनी, दुकानदार यांनी थोपवलेले बुरशीनाशक जर चुकिचे असेल तर ते रोगात प्रत्येक वापरानंतर प्रतिकारक शक्ती वाढवणार आहे, आणि ज्या बुरशीचा जीवनक्रम हा मात्र २-३ दिवसांत पुर्णत्वास जातो (म्हणजे ती पुनरुत्पादनास तयार होवुन नविन पिढी तयार करते) त्या बुरशीत एखादे चुकिचे बुरशीनाशक वापरले गेले तर तयार होणारी प्रतिकारक बुरशीची पिढी ही त्वरित तयार होणार आणि मोठ्या प्रमाणावर तयार होणार. शेती अस क्षेत्र आहे, की, अरे दादा, माझ्या कडे अमुक प्रोडक्ट चा छान रिझल्ट आला, तु पण वापर, अस आपण दररोज करत असतो. पण विल्ट तात्पुरता कशा प्रकारे आणि कोणत्या बुरशीनाशकामुळे जातो हे अभ्यास करुनच पुढची वाटचाल करावी. हि विनंती राहील.
  • ◉ ह्या रोगाच्या नियंत्रणात रासायनिक बुरशीनाशक हा पर्याय फारसा उपयोगी नाही, हे लक्षात ठेवावे. स्वच्छता, मनसंयम, शेतातील वर्दळ कमी करणे, निरोगी रोप, आणि माती कडक होईल असेल कोणतेही कृत्य न करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.
  • ◉ कॉर्डन आणि यंग ह्यानी केलेल्या संशोधनात अनेक बुरशीनाशकांचा विल्ट नियंत्रणात काहीही फायदा होत नाही असे संशोधन आहे. तर हर्बर्ट आणि मॅक्स ह्यांनी कार्बन्डाझिम चा इन्जक्शन म्हणुन साऊथ अफ्रिकेत वापर केला असता ते देखिल त्यांना प्रभावी दिसुन आले नाही.
  • ◉ मेरिडिथ ह्यांनी पारायुक्त बुरशीनाशकांचा वापर केला असता, काही प्रमाणात तात्पुरते नियंत्रण मिळते असा निष्कर्ष काढला आहे. पारायुक्त बुरशीनाशकांत झायरम, झिनेब वै. चा समावेश होतो.
  • ◉ लक्ष्मण ह्यांनी केलेल्या संशोधनात, कार्बन्डाझिम च्या वापरातुन (इन्जेक्शन च्या व्दारे) तात्पुरता परिणाम मिळतो असे निष्कर्ष काढले आहेत.
  • ◉ ऑस्ट्रेलियात कॉपर ऑक्सिक्लोराईड चा वापर केला असता फायदा दिसुन आला आहे.
  • ◉ रासायनिक नियंत्रणात बेनोमिल, मिथिल थाय़ोफोनेट, स्पायरोकेटालामाईन, पायरिमिथीनील, एझोक्सोस्ट्रोबीन, सायप्रोकोनॅझोल, फ्लुट्रिनाफोल हि पिकात वहनशील बुरशीनाशके वापरता येण्या सारखी आहेत.
  • ◉ ट्रायडिमेनोल, इपॉक्झिकोनॅझोल, टेब्युकोनॅझोल, प्रोपीकोनॅझोल, फ्लुसिलॅझोल हि मध्यम स्वरुपात, पिकात वहनशील असणारी बुरशीनाशके देखिल वापरता येण्या सारखी आहेत.
  • ◉ हेझ्काकोनॅझोल, बिट्रिटेनॉल, डायफेनकोनॅझोल, ट्राफ्लोक्झिस्ट्रॉबीन ह्या सारखी पिकात अत्यंत कमी प्रमाणात वहनशील असणारी बुरशीनाशके देखिल आहेत.
  • ◉ वरिल क्रमांक १९ आणि २० मधिल बुरशीनाशके हि मुळांच्या जवळ आणि सर्वात उत्तम म्हणजे खोडात इन्जेक्शन च्या माध्यमातुन देणे फायदेशीर ठरते.
  • ◉ जैविक नियंत्रणात ट्रायकोडर्मा हरजॅनियम चा 8x10⁹ कोनिडिया /ग्रॅम इतक्या तिव्रतेचे उत्पादन २० ग्रॅम प्रती रोप वापरले असता रोगावर चांगले नियंत्रण मिळते.
  • ◉ ट्रायकोडर्मा विरिडे आणि सुडोमोनास फ्लुरोसन्स ह्यांचा एकत्रित वापर (६० आणि १८० दिवस लागवडीनंतर) केला असता रोगावर नियंत्रण मिळण्यात मदत मिळते. जेथे वापर केला तेथ कंट्रोल च्या तुलनेत केवळ २७.७८ टक्के इतकाच प्रार्दुभाव आढळुन आला. जेथे वापर केला नाही तेथे ८६.६७ टक्के प्रार्दुभाव आढळुन आला.
  • ◉ पनामा विल्ट नियंत्रणात बॅसिलस स्पे. जीवाणुंचा वापर देखिल फायदेशीर आढळुन आला आहे. बॅसिलस स्पे. (बॅसिलस सबटिल, बॅसिलस एमिलोलिक्विफॅन्सीस) च्या वापरातुन विल्ट ८० टक्के नियंत्रणात राहिल्याची नोंद आहे.
  • ◉ शेतात उपयुक्त जीवाणुंची संख्या वाढवणे, एक्टिनोमायसिटस चा वापर न करणे (स्लरी वै. चा वापर टाळावा. घरीच जीवाणु, बुरशी वाढवणे टाळावे.) व्हॅम (मायकोरायझा) चा वापर करण्याची देखिल शिफारस केली जाते.
  • ◉ वरिल सर्वच नियंत्रण पध्दतींच्या बाबतीत संदर्भ ह्या ठिकणी देण्यात आलेले आहेत.
  • ◉ भाग ४ मध्ये आपण बघुया पिक फेरपालट सारख्या सोप्या पध्दतीबाबत आपण जाणून घेवु. हि पध्दत जास्त फायदेशीर ठरते जेव्हा रोग आवाक्या बाहेर जातो.

 

पाने पिवळी पडुन सुकतात
काळसर झालेले फळ, घड बाहेर येतांनांच त्यातील फळे काळी होतात.
खोड आडवे चिरले असता त्यातुन येणारा पिवळा द्रव
फळांवरिल लक्षणे - फळ पिवळे पडते.
पाने पिवळी पडुन सुकणे
फळांतील काळसर डाग