logo

Banana Fertilizer Management / खत व्यवस्थापन

केळी पिकांस द्यावयाच्या जमिनीतील खतांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. (किलो प्रती १००० खोड)

लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश झिंक सल्फेट फेरस सल्फेट
0-15 दिवस 25 25 25 00 00
30-40 दिवस 25 25 50 10 10
60-70 दिवस 25 00 25 00 00
90-100 दिवस 00 10 00 05 05
120-130 दिवस 25 00 50 00 00
150-160 दिवस 00 00 00 2.5 00
180-200 दिवस 00 10 50 2.5 00
240-250 दिवस 25 00 50 00 2.5
300 - 310 दिवस 25 00 50 00 00
एकुण- 150 70 325 20 17.5

(तक्‍यात दिलेल्‍या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्‍य ते बदल करावे)

लागवडीनंतर दिवस कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट गंधक बोरॉन
0-15 दिवस 00 00 00 00
30-40 दिवस 10 25 01 00
60-70 दिवस 00 25 01 00
90-100 दिवस 05 25 01 250 ग्रॅम
120-130 दिवस 00 00 00 00
150-160 दिवस 00 00 01 250 ग्रॅम
180-200 दिवस 00 25 01 250 ग्रॅम
240-250 दिवस 00 00 00 100 ग्रॅम
300 - 310 दिवस 00 00 00 00
एकुण- 25 100 05 850 ग्रॅम

(तक्‍यात दिलेल्‍या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्‍य ते बदल करावे)

केळी पिकाची पालाशची गरज ही जास्त असल्या कारणाने त्या पिकासाठी देण्यात येणा-या रासायनिक खतांच्या शिफारशीत मॅग्नेशियम सल्फेट चे प्रमाण १०० किलो प्रती १००० खोड करण्यात आले आहे. या १०० किलो मॅग्नेशियम सल्फेट खतांतुन ९ किलो मॅग्नेशियम पिकास मिळतो. पालाश युक्त खतांच्या जास्त वापराने केळी पिकांत मॅग्नेशियमची कमतरता सतत जाणवत असते, शिवाय या कमतरतेमुळे मुळांच्या वाढीवर तसेच केळीच्या आकारावर विपरित परिणाम जाणवतात. केळी पिकांस पालाश युक्त खतांसोबत मॅग्नेशियम चा वापर करु नये.

केळी पिकांत कमळ फुल तोडल्यानंतर दर ८ ते १५ दिवसांनी शिफारस केलेली पालाश व नत्राची मात्रा हि समान अशा १० ते १५ भागात विभागुन ड्रिपव्दारे द्यावी. असे केल्याने फळांचा आकार व वजन वाढीत मदत मिळते.

तसेच वरिल पत्रका व्यतिरिक्त देखिल पालाश चे प्रमाण ५०० किलो प्रती १००० खोड पर्यंत वाढवता येते.

पिकाची वाढीची अवस्था फवारणीची खते प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर 20 ते 30 दिवस 19-19-19 4-5 ग्रॅम
चिलेटेड झिंक 1 ग्रॅम
लागवडीनंतर 45 ते 60 दिवस कॅल्शियम नायट्रेट 2-3 ग्रॅम
बोरॉन 20 टक्के 1 ग्रॅम
केळ फुल तोडल्यानंतर 3 ते 7 दिवस 13-00-45 4-5 ग्रॅम
मायक्रोन्यट्रिएंटस 2-3 मिली
वरिल फवारणीनंतर 8 दिवसांनी 13-00-50 4-5 ग्रॅम
जी.ए. 3 10 पीपीएम (1 ग्रॅम प्रती 100 लि. पाणी)
वरिल फवारणीनंतर 8 दिवसांनी 00-00-50 4-5 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर 8 दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम

 

(तक्‍यात दिलेल्‍या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्‍य ते बदल करावे)