logo

अँन्थ्रॅक्नोझ (ग्लोईओस्पोरियम मुसे)

लक्षणे

केळी च्या फळांवर प्रामुख्याने हा रोग दिसुन येतो.

फळाच्या वाढीच्या सर्वच अवस्थांत हा रोग दिसुन येतो.

फळांवर मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पडतात. तसेच या डागांवर बुरशीची वाढ देखिल दिसुन येते.

उपाययोजना

केळीचा घड निसवल्या नंतर फळांवर डाग दिसत असतिल तर क्लोरोथॅलोनिल ०.५ ग्रॅम, आणि बावीस्टीन १.५ - २ ग्रॅम प्रती लि. पाण्यात घेवुन फवारणी करावी. त्यानंतर कॅपटन २ ग्रॅम व हेक्झाकोनॅझोल १ मिली घेवुन फवारणी करावी. अशा प्रकारे आलटुन पालटुन २ ते ४ फवारणी घेता येतिल.

बागेत स्वच्छता ठेवावी.

 

फळांवर मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पडतात
फळांवर मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पडतात
डागांवर बुरशीची वाढ देखिल दिसुन येते