logo

Phyotopthora Leaf Blight| फायटोप्थोरा ब्लाईट

Phytophthora colocasiae ह्या बुरशीमुळे हा रोग होतो. फायटोप्थोरा ही बुरशी ऊमायसिटस ह्या गटात मोडते, जी ईतर बुरशीपेक्षा काही प्रमाणात वेगळी असते.

रोगाच्या वाढीसाठी वातावरण पोषक असल्यास ५ ते ७ दिवसांत पुर्ण क्षेत्रात रोग वेगाने पसरतो. रोगाची लागण जास्त प्रमाणात असल्यास पुर्ण पान आणि पानांचा देठ देखिल प्रभावित होतो. पानांच्या देठातुन हा रोग जमिनीत वाढणा-या कंदांपर्यंत जावुन पोहचतो आणि कंद सड सुरु होते. फायटोप्थोरा मुळे सडणा-या कंदांना दुर्गंधी नसते, त्यांचा घाणेरडा असा वास येत नाही. रोगाच्या वाढीसाठी आर्द्रतायुक्त वातावरण, रात्रीचे तापमान २० ते २२ डि.से. आणि दिवसाते तापमान २५ ते २८ डि.से. पोषक ठरते. पावसाच्या वातावरणात रोगाची लागण आणि वाढ झपाट्याने होते.

Phytopthora Blight
Phytopthora Blight

रोगाची लागण झाल्यानंतर, पानांवर १ ते २ से.मी. आकाराचे ओलसर ठिपके पडतात. अशा ठिपक्यातुन अनेक वेळेस लालसर, जांभळा रंगाचा द्रव स्व्रवतांना देखिल दिसुन येतो. हा द्रव गर्द वाळल्यानंतर गर्द जांभळा, किंवा गर्द पिवळ्या रंगाचा दिसुन येतो. लहान आकाराचे ठिपके उबदार वातावरणात वेगात वाढुन पानाचा मोठा भाग व्यापुन घेतात. उबदार दिवसांमधे रोगाची वाढ झपाट्याने होते. रोगाच्या बुरशीचे स्पोरॅंजिया ह्या पानाच्या दोन्ही बाजुला पांढ-या रंगाच्या पावडर सारखे दिसुन येतात.

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
कासुगामासिन आंतरप्रवाही -
व्हॅलिडामायसिन आंतरप्रवाही -
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त